BREAKING NEWS
Search

मोबाईल चोराच्या रेल्वे रुळावरून पाठलाग करत मुसक्या आवळल्या –  मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीसांची धडाकेबाज कारवाई 

486

     दादर,मुंबई : (सा.समाजशील वृत्तसेवा) – मोबाईल चोरून पळणाऱ्या चोरट्याचा  रेल्वे रुळावरून पाठलाग करत  मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीसांनी मुसक्या आवळत धडाकेबाज कारवाई केली आहे. पोलीस अंमलदार ताटू व हवालदार देसले यांनी ही धडाकेबाज कारवाई जिवाची पर्वा न करता रेल्वे रुळावर पाठवलाग करून केली आहे. या दोन धाडसी पोलिसांचे लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त मकानदार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर काटकर यांनी अभिनंदन केले आहे.

मुंबई लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मस्जिद रेल्वे स्थानकात प्रवाशांचा मोबाईल खेचून पळणाऱ्याला चोरट्याच्या रेल्वे रुळावर पाठलाग करून मुसक्या आवळण्यात आल्या. ही धडाकेबाज कारवाई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या अंमलादर ताटू व हवालदार देसले यांनी केली. या आरोपीकडून चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
सध्या कोरोनाचे सावट कमी होत असल्याने अनेक ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. कोरोना काळात धास्तावलेले चोर आता पुन्हा सक्रिय होत असल्याचे या घटनेतून दिसत आहे. या चोरट्यांवर कारवाई करण्याचे आदेश लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिलेले असल्याने लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त मकानदार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस आता विशेष मोहीम राबवत आहेत.
या मोहिमेंतर्गत सराईत चोरट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. सी. शेख, पोलीस उपनिरीक्षक माने, पोलीस हवालदार देसले, पोलीस अंमलदार ताटू, पोलीस अंमलदार चव्हाण हे २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावरील मस्जिद रेल्वे स्थानकात गस्त घालत होते. त्यावेळी फलाट क्रमांक ३ एक लोकल आली. त्या लोकलमधील प्रवाशाचा मोबाईल खेचून एका चोरट्याने रेल्वे रुळावर उडी मारून फलाट क्रमांक २ वर आला. नेमके त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस अंमलदार ताटू व हवालदार देसले यांनी त्या चोरट्याला पाहिले. साध्या वेशात असलेल्या पोलिसांना पाहून चोरटा उलट्या पावलांनी पुन्हा रेल्वे रुळावर उडी मारून पळाला. त्यावेळी जिवाची परवा न करता पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून रेल्वे रुळात त्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान, त्या चोरट्याची कसून चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव जुबेर शब्बीर शेख (२३, रा. राधाकृष्ण होटेलजवळ, झोपडपट्टी मस्जिद, मुंबई बंदर) असे सांगितले. या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज लोहमार्ग पोलीस ठाण्यात (गु. र. क्र.४८/२०२१) भादंवि कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. सी. शेख करत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *