BREAKING NEWS
Search

वढू बुद्रुक येथे मानव बिबट संघर्ष जनजागृती कार्यक्रम

611

    टाकळी हाजी ता.शिरूर :  (प्रतिनिधी,सतीश भाकरे) – शिरूर तालुक्यातीळ वढू बुद्रुक येथील श्री शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र वन विभाग शिरूर व वाइल्ड लाइफ केअर फॉउंडेशन यांच्या सहयोगाने मानव बिबट संघर्ष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील मुलांना बिबट्या या वन्य प्राण्या बद्दल, तसेच त्याचे  राहणीमान, स्वभाव या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच त्याचे मानवी वस्तीत येण्याची कारणे व त्यासाठीच्या करावयाच्या उपाय योजना ही देखील माहिती देण्यात आली. ही सर्व माहिती  निखिल गवारी (वाइल्ड लाईफ बियॉलॉजिस्ट) वाइल्ड लाईफ केअर फॉउंडेशन यांनी दिली. या कार्यक्रमासाठी शिरूर वन विभागाचे वन सेवक हरगुडे तसेच गावकरी बचाव पथकाचे सदस्य गणेश टिळेकर, जयेश टेमकर, बाळासाहेब मोरे उपस्थित होते. शाळेतील सर्व शिक्षक वृंद व मुख्याध्यापक चव्हाण यांनी या कार्यक्रम साठी विषेश सहकार्य केले. अशी माहिती मुलांना मिळत राहावी जेणे करून मुलांना या वन्य प्राण्या बद्दल प्रेम निर्माण व्हावे तसेच त्या प्राण्या बद्दल असलेले गैरसमज दूर होतील व शिरूर तालुक्यातील हा मानव बिबट संघर्ष कमी होण्यास मदत होईल अशी आशा मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी व्यक्त केली. वन विभाग शिरूर व वाइल्ड लाईफ केअर फॉउंडेशन या संस्थेचे त्यांनी आभार मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *