BREAKING NEWS
Search

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिस प्रशासन व नगरपंचायत यांची संयुक्त बैठक

318

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड शहरांतील वाहतूक कोंडी हा नागरिकांनसाठी जेवढा डोके दुखीचा विषय आहे तेवढाच पोलिस व नगरपंचायत च्याही डोकेदुखी चा विषय ठरला आहे. आता शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिस प्रशासन व नगरपंचायत यांची संयुक्त बैठक झाली असुन, मुरबाड चे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी एका व्हिडीओ द्वारे मुरबाडकरांना शिस्तीचे आवाहन करत शिस्त न पाळल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे. या व्हिडिओतील आवाहनाला मुरबाडकर प्रतिसाद देत असून अवाहानचे समर्थनही करत आहे. मात्र मुरबाड नगरपंचायतच्या आंधळ्या कारभारामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे काही नागरिकांकडून बोलले जात आहे.

     मुरबाड शहरात मागील तीन वर्षापासून सम-विषम पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. मोठ्या वाहनाच्या पार्किंगसाठी जागा नियोजित केल्या. मात्र अमलबजावणी केली नाही मनसेच्या मागणी नंतर वाहतुकीस धोकादायक ठरणारे पोल हटविण्यात आले. मात्र पायी चालणाऱ्यांसाठी बनवलेले फुटपाथ मोकळे करण्यात आजही अपयश आले आहेत. तर रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारे फेरीवाले, पाणीपुरी, वडापाव यांच्या गाड्या यांच्यासाठी जागानियोजित न करणे या सर्व बाबी नगरपंचायत ने दुर्लक्षित ठेवल्यात. तर रिक्षा चालकांची बेशिस्थ वाहतूक, व्यापारी वर्गाची अवजड वाहने कधीही मार्केटमध्ये येऊन रहदारी ला अडचण करणे अश्या अनेक बाबी असताना नगरपंचायत ने आज पर्यंत या कडे दुर्लक्ष का केले? असा सवाल विचारला जात आहे. त्यामूळे नागरिक या आवाहनाला किती प्रतिसाद देतात. नगरपंचायत फुटपाथ मोकळे कधी करते? सम-विषम पार्किंग चे नियोजन कधी करते ? काही हॉटेल, मार्केट वाल्यांनी फुटपाथ समोर लोखंडी पायरी तयार करून केलेले अतिक्रमण कधी हटवणार? अशी विचारणा आता केली जात आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *