BREAKING NEWS
Search

शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाल खरपुडे यांची निवड

365
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरुर तालुक्यात अत्यंत महत्वपुर्ण समजल्या जाणाऱ्या शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाल पांडुरंग खरपुडे यांची निवड झाली. खरपुडे हे वार्ड क्र. ५ मधील ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या सभागृहात शिक्रापूचे सरपंच रमेश गडदे यांच्या अध्यक्षते खाली निवडणूक पार पडली. उपसरपंचपदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते. विशाल खरपुडे व कृष्णा सासवडे यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते. खरपुडे यांना १० तर सासवडे यांना ७ मते पडली. खरपुडे यांना विजयी घोषित करण्यात आले. शिक्रापूरचे उपसरपंच मयुर करंजे यानी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानुसार ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी ग्रामसेवक शिवाजी शिंदे यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणूक निकालानंतर ग्रामपंचायत ते ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरापर्यंत पारंपारिक वाद्यांच्या गजरात गुलालाची उधळण करत विजयी मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदैवत भैरवनाथाचे आशिर्वाद घेऊन एकमेकांना पेढे भरवत विजयी सभा पार पडली. कार्यक्रमाचे सुञसंचालन युवा नेते विशाल गायकवाड यांनी केले. यावेळी माजी उपसरपंच शुभाष खैरे, समता परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक सोमनाथ भुजबळ, पँनेल प्रमुख शिरिष जकाते, मोहिनी मांढरे, पुजा भुजबळ आदीनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सोसायटी चेअरमन निलेश थोरात, हेंमंत करंजे, विठ्ठल सोंडे यांच्या सह विशाल खरपुडे मिञ मंडळाचे सर्व सदस्य, कानिफनाथ तरुण मंडळाचे सदस्य, मैञी गुपचे सर्व सदस्य, शिक्रापूर परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्य ने उपस्थित होते. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच विशाल खरपुडे यानी “समाजशील” प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *