BREAKING NEWS
Search

शिक्रापूर येथील भैरवनाथ मदिर सुशोभिकरणासाठी तब्बल १कोटीचा निधी

113

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) :  शिक्रापूर येथील भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ मांढरे यांच्या पाठपुराव्यानंतर पर्यटन मंञी गिरिश महाजन यांनी शिक्रापूर येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिर सुशोभिकरणासाठी तब्बल एक कोटीचा निधी उपलब्ध करुन दिल्याची माहिती अध्यक्ष राजाभाऊ मांढरे यानी दिली. शिक्रापूर परिसर हा दिवसोंदिवस शहरी करणाकडे वाटचाल करत आहे .दिवसोंदिवस या भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.   हे सर्व लक्षात घेऊन मांढरे यानी विधान भवनात जाऊन महाजन भेट घेऊन सर्व वस्तुस्थिती सांगितली. त्याची दखल घेऊन तब्बल एक कोटीचा निधी मिळवुन दिला.भैरवनाथ मंदिर हे जागृत देवस्थान दरवर्षी येथे मोठमोठे कार्यक्रम होतात.शिक्रापूर वासियांचे ग्रामदैवत असुन येथील नागरिकाची श्रध्दा मोठ्या प्रमाणात आहे .निधीच्या माध्यमातून सभामंडपाचे वर भक्तनिवास .पेव्हिंग ब्लॉक .वृक्ष लागवड . आदी ऊपक्रभा राबवणार आसल्याचे मांढरे यांनी सांगितलेमाढरे यांच्या पाठापुराव्याला कसालाही विलंब न करताना महाजन यानी त्याची मागणी त्वरित मंजुर केली .त्यांच्या या अथक प्रयत्न केल्याने यश मिळाले त्याचे कौतुक होत आहे .मांढरे हे शिरुर तालुका भाजपा उद्योग आघाडीचे अध्यक्ष असुन त्यांनी पक्षाच्या माध्यमातून अनेक योजना शिक्रापूर वासियांसाठी राबवणार असल्याचे सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *