BREAKING NEWS
Search

शिक्रापूर येथे जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन व्याख्यान

112

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र शिक्रापूर यांच्यावतीने आहारातून आरोग्याकडे या उपक्रमांतर्गत मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, थायरॉईड, हाडांचेविकार, हृदयरोग इत्यादींसारखे आजार होऊ नयेत आणि झालेले आजार कसलेही औषध गोळी न घेता फक्त आहारातून कसे नियंत्रणात येतात या विषयी आहार तज्ञ् श्री संजय तुकाराम दरेकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी बॉडी कशा पद्धतीने डिटॉक्स करायची ,प्रथीने जीवनसत्वे खनिजे यांचे आरोग्यास महत्व पटवून प्रात्यक्षिक करून दिले. यावेळी सर्वांचे आरोग्य सुदृढ राहून आजार होणार नाहीत यावर श्री दरेकर यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रावसाहेब करंजे पाटील यांनी भूषविले.  तसेच ज्येष्ठ नागरिक श्री विश्वासबापू मांढरे, श्री रमेश भुजबळ, श्री प्रताप बांदल, श्री सुभाष खैरे, श्री सुदाम काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमांस महिला बहुसंख्येने उपस्थित राहिल्या त्यामध्ये सौ साधनाताई जगताप, सौभीमाताई धुमाळ, सौ वंदना कापसे, सौ कमल वाळवेकर, नीता कळंबेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जयश्री फुलावरे, सेवानिवृत्तमुख्याद्यापिका यांनी उत्कृष्टपणे केले आणि आभार प्रदर्शन श्री रमेश भुजबळ यांनी केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *