BREAKING NEWS
Search

शिरूरच्या बेट भागात कोरोना रुग्ण संख्या वाढतेय – मलठण कोविड  सेंटरला सर्व सुविधा उपलब्ध करा – डॉ सुभाष पोकळे यांची मागणी 

430
                  शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यात तसेच बेट भागामध्ये कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन मलठण येथिल कोविड सेंटर मध्ये दाखल होणाऱ्या रुग्नासाठी शासनाने ऑक्सिजन, व्हेंटिलेटरयुक्त बेड तत्काळ उपलब्ध करावे.तसेच उपचारा अभावी एखाद्या रुग्नाचा मृत्यू झाल्यास मृत्यूची जबाबदारी कोणावर तरी निश्चित करावी अशी मागणी शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांनी केली आहे.
शिरूर तालुक्यातील रुग्नांची वाढती संख्या सर्वासाठी चिंताजनक ठरु लागली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मलठण येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले असुन सबंधित कोविड सेंटरचा लाभ पेंशंटला होतो की नाही अशी शंका नागरिकांमधून उपस्थित होत आहे. याठिकाणी रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी तसेच ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सेवा उपलब्ध नसल्याने रुग्नाचे नातेवाईक चिंतेत असलेले पहावयास मिळत आहेत. अचानक एखाद्या रुग्णाना त्रास जाणवू लागल्यावर ज्या ज्या पेशंटला ऑक्सिजनची गरज आहे हे सगळे पेशंट आज आपली आर्थिक परिस्थिती नसताना सुध्दा कोरोनाच्या भितीमुळे वेगवेगळ्या खाजगी दवाखान्यात दाखल होऊन उपचार घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर एखाद्या रूग्नाला शिरूरला उपचारासाठी दाखल होता नाही आले तर तो रूग्न पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन सुध्दा माहागडे उपचार त्या ठिकाणी जाऊन घेत आहेत.

शिरूर तालुक्यातील पश्चिम व बेटभागात कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने मलठण कोविड सेंटर मध्ये रुग्ण संख्या वाढू लागली असल्याने बेडची संख्या कमी पडू लागली असताना प्रशासनाने येथे तात्काळ  बेडची संख्या वाढवावी. तसेच रूग्नांसाठी मलठण येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर युक्त बेड उपलब्ध करण्याची मागणी डॉ. सुभाष पोकळे यांनी केली आहे.

— डॉ. सुभाष पोकळे – सदस्य, पंचायत समिती शिरूर
शिरूर तालुक्यात ज्या ज्या रुग्णालयामध्ये कोविड किंवा कोरोनाचे पेशंटवर उपचार करण्याची सुविधा आहे.  त्यांना महात्मा फुले योजणे अंतर्गत किंवा राजीव गांधी  योजने अंतर्गत सरकारने त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *