BREAKING NEWS
Search

शिरूर,पुणे : शिरूरच्या सेंट जोसेफ स्कूल मध्ये मॉम्स डे साजरा; शिरूरच्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांची उपस्थिती

560
           शिरूर,पुणे : काल दि. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधत या  ही वर्षी शिरूरच्या सेंट जोसेफ स्कूल मध्ये महिलांना स्वतः मधील गुण व्यक्त करण्यात यावे,त्यांच्यात धाडस निर्माण व्हावे यासाठी मॉम्स डे साजरा करण्यात आला. यामध्ये अनेक महिलांनी  सुंदर नृत्य सादर केले. काहीं महिलांनी कविता सादर केल्या.तर काही महिलांनी राजमाता जिजाऊ  यांच्यावर आधारित एकांकिका सादर केली. यावेळी महिलांचा उत्साह व आनंद द्विगुणित झालेला पाहावयास मिळत होता. या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या महिलागृपने प्रथम आकर्षक नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरवात केली.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शिरूरच्या  नगराध्यक्षा वैशाली वाखरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.स्कूलच्या प्राचार्या नॅन्सी मिस यांनी सर्वांचे स्वागत करून सर्व मातांना कार्यक्रमात यशस्वी सहभागाबद्दल गोल्ड मेडल दिले व सर्वांचे आभार मानले.जुने शिरूर येथील रामलिंग मंगलकार्यालय येथे हा मॉम’स डे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
– सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *