BREAKING NEWS
Search

शिरूर कृषी विभागाला अधिकारी,कर्मचारी मिळतील काय ? शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा करावा लागतोय सामना 

832
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कृषी विभागात मोठ्या प्रमाणावर कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून शिरूर कृषी विभागाला अधिकारी,कर्मचारी मिळतील काय ? असे म्हणण्याची वेळ आली असून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून अतिरिक्त कामाचा ताण वाढल्याने शिरूर कृषी विभागात कृषी सहायक हे तणावाखाली काम करत असल्याचे गंभीर चित्र पाहावयास मिळत आहे.
शिरूर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा तालुका आहे. तालुक्यात  पाबळ, शिक्रापूर, शिरूर,न्हावरा या गावांना मंडल कृषी अधिकारी यांची नेमणूक झालेली आहे.तर प्रत्येक गावांना कृषी सहायक यांच्या मार्फत शासनाचे कृषी विषयक सल्ला,मार्गदर्शन व योजना राबविण्यासाठी कृषी सहायक यांची नेमणूक केलेली असते.
         प्राप्त माहिती नुसार शिरूर तालुक्यात मंडल कृषी अधिकारी यांची पाच पदे मंजूर आहेत परंतु पाच ही जागा या रिक्त आहेत.शिरूर तालुक्याला एकूण ४९ कृषी सहायकांच्या जागा मंजूर आहेत परंतु केवळ ३१ कृषी सहायक असून १८ जागा या रिक्त आहेत.कार्यालयीन कामकाजासाठी चार जागा मंजूर आहेत.  परंतु एकही लिपिक नाही. अनुरेखक यांची सहा पदे रिक्त आहेत. शिपाई,रखवालदार यांची सात पदे मंजूर आहेत ही सर्व पदे रिक्त आहेत.
तालुक्यात प्रत्येक गावांतील शेतकरयांना मदत मिळण्यासाठी व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळण्यासाठी कृषी सहायक महत्वाचा दुवा असतो.या मार्फत अनेक योजना,शेतीचे प्रयोग शेतात राबविले जातात.  मात्र प्रत्येक कृषी सहायकांवर चार ते पाच गावे ही अधिकची जबाबदारी आहे.अनेक गावे ही लांब अंतराची असतात.त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण,शासकीय कामाच्या इतर व्याप यामुळे सर्व अधिकारी हे तणावाखाली काम करत आहेत.कृषी विभागात कार्यालयात देखील पुरेसा स्टाफ उपलब्ध नसल्याने अनेकदा कृषी सहायकाना ती ही जबाबदारी पार पाडावी लागते.ज्या तालुक्याला मंडळ कृषी अधिकारी हे अधिक महत्त्वाचे असतात,तिथे एकही कृषी अधिकारी नसल्याने कृषी विभागाचे कामकाज करायचे कसे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांना विचारले असता,शिरूर मधीलच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील रिक्त कृषी अधिकारी,कर्मचारी पदावर नवीन नियुक्ती संदर्भातील सर्व माहिती व त्यासंदर्भातील अवहाल शासनाकडे पाठविण्यात आले असून शासन स्तरावरून च याबाबत योग्य ती कार्यवाही होईल असे ही काचोळे यांनी सांगितले.
 तर याबाबत अतिरिक्त कामाचा ताण,रिक्त पदे,लांब असलेली गावे यामुळे आम्ही मेटाकुटीला आलो असून यामुळे आम्ही तणावात वावरत असल्याचे व तरीही काम सर्वजण पूर्ण क्षमतेने काम करत असल्याचे काही कृषी सहायकानी सांगितले.शासनाने आमच्या अडचणी समजून त्वरेने पुरेसे कृषी सहायक उपलब्ध करून द्यावे,कामाचा ताण कमी करावा अशीही मागणी काहींनी केली.
     किसनराव हिलाळ – सामाजिक कार्यकर्ते,शेतकरी,मुंजाळवाडी 
आमच्या कवठे विभागातील कृषी सहायक नंदू जाधव यांच्याकडे गेले तीन वर्षांपासून तीन पदभार देण्यात आले आहे. सदर पदभार गेल्या तीन वर्षांपासून कृषि सहायक यांच्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने नंदू जाधव यांच्याकडे देण्यात आल्या आहेत.  नंदू जाधव हे गेले तीन वर्षांपासून कवठे येमाई, मुंजाळवाडी, ईचकेवाडी, सविंदणे, निमगाव दुडे, रावडेवाडी या गावातील काम पाहत आहेत, आजतागायत या गावातील कामे जाधव हे अतिशय उत्कृष्टपणे,स्वच्छ, व प्रामाणिक पणे करत आहेत असे शेतकरी वर्गातून एकव्यास मिळत आहे. परंतु दिवसेंदिवस कामाची व्याप्ती पाहता व शेतकरी वर्गाचे समस्या पाहता या गावांमध्ये कृषि सहाययक यांची पदे भरणे अत्यंत गरजेचे आहे. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *