BREAKING NEWS
Search

शिरूर मधील शिधापत्रिका धारकांना जलद सेवा देणार – नवीन पुरवठा निरीक्षण आधिकारी सदाशिव व्होणमाने यांचे आश्वासन 

8
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) –  शिरूर तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना अधिकाधिक जलद सेवा देणार असल्याचे आश्वासन शिरूरच्या पुरवठा विभागात नव्यानेच पुरवठा निरीक्षण अधिकारी म्हणून रुजू झालेले या विभागाचे नायब तहसीलदार सदाशिव व्होणमाने यांनी सा.समाजशील शी बोलताना दिले आहे.
        यापुर्वी सदाशिव व्होणमाने यांनी पुरवठा निरीक्षक म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, संग्रामपूर या तालुक्यामध्ये अतिशय प्रभावीपणे काम केलेले आहे.तर भारतीय हवाई दलात २० वर्षे प्रामाणिकपणे काम त्यांनी केलेले आहे. शिरूर तालुक्यात सध्यस्थितीत २० हजार ५६८ शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ मिळत नसून त्या शिधापत्रिकेतील तब्बल ९० हजार ३२९ लाभार्थी  धान्यापासून वंचित आहेत. शिरूर तालुक्यात धान्य न मिळणाऱ्यांची मोठी संख्या असून पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यापाठोपाठ शिरूर तालुक्यातील ही संख्या मोठी आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे वाढीव इष्टांक मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असून हा इस्टांक आल्यास प्राधान्याने विधवा, परितक्त्या,निराधार,अपंग या लाभार्थ्यांना तातडीने लाभ देण्यात येईल. तसेच नागरीकांची प्रलंबित असलेली कामे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर मार्गी लावन्याचा प्रयत्न करणार असल्याचे पुरवठा नायब तहसीलदार सदाशिव व्होणमाने  यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *