BREAKING NEWS
Search

शिवसेनेच्या वतीने कोरेगाव भिमा / मांडवगण फराटा येथे कानडी सरकाराचा पुतळा दहन करुन तीव्र निषेध  

448

               शिक्रापूर,ता.शिरूर : (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) – शिरुर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने कोरेगाव भिमा / मांडवगण फराटा येथे कानडी सरकाराचा पुतळा दहन करुन तीव्र निषेध करण्यात आला.

         कर्नाटक बेळगाव येथील मनगुत्ती गावामधील काही शिवद्रोही लोकांनी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला.  त्याच्या निषेधार्थ शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मा.खासदार, शिवसेना उपनेते तथा संर्पकप्रमुख शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर (आबा) कटके यांच्या नेत्रुत्त्वाखाली आज शिवसेना पुणे सल्लागार अनिल काशीद यांच्या उपस्थितीत कोरेगाव भीमा येथे शिवद्रोही कानडी सरकारचा पुतळा दहन करण्यात आला. तसेच मांडवगण फराटा येथे पुणे उपजिल्हाप्रमुख  पोपटराव शेलार, शिरुर तालुका प्रमुख सुधीर फराटे व सर्व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *