BREAKING NEWS
Search

शुभम युथ फाऊंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

235

शिवाजी गदादे यांच्याकडून इयत्ता दहावीतील पाच मुलांची द्वितीय सत्राची फी

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर तालुक्यातील तांदळी येथे दि. 28 जानेवारी रोजी शुभम युथ फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते व त्यांचे कुटुंबीय यांनी कै.केशव पांडुरंग गदादे विद्यालय तांदळी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळी या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या वतीने गणवेश वाटप केले. यावेळी प्रत्येक वर्गातील तीन मुली व तीन मुले यांना गणवेश वाटप करण्यात आले. तर घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शिवाजी मुक्ताजी गदादे यांनी इयत्ता दहावीतील पाच मुलांची द्वितीय सत्राची फी विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजय कळसकर यांनी भूषविले. तर विद्यालयाचे मुख्याध्यापक खारतोडे आबासाहेब विश्वनाथ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी पंचायत समितीचे कार्यक्षम  सदस्य राजेंद्र पोपट गदादे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरवर्षी या फाउंडेशनच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात.यावेळी घोडगंगा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन प्रा सुभाष कळसक,  कळसकरवाडी येथील माजी उपसरपंच लक्ष्मण नाना कळसकर, विशाल कळसकर , डॉ.संजय कळसकर संभाजी नलगे, नितीन कळसकर विकास बनकर, नवनाथ बनकर, विलास कळसकर ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक राजेंद्र गदादे सर यांनी केले. तर विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केल्याबद्दल तसेच विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांची फी भरल्याबद्दल फाउंडेशन चे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *