कोपरगाव,अहमदनगर : (स्वप्नील कोपरे,सा.समाजशील वृत्तसेवा) – टु-व्हीलर गाडीने निमगाव- खैरी कडे जात असताना मागील बाजूने टेम्पोरिक्षाने धडक दिल्याने श्रीरामपुर शहरातील वार्ड नं २ मधील २७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत युवकाचे नाव हे सोहेल शमसुद्दीन शेख रा. श्रीरामपूर असे असुन तो आपल्या टु-व्हीलर गाडीने निमगाव- खैरी कडे जात असताना मागील बाजूने त्याला टेम्पोरिक्षाने धडक दिली. ही घटना सुमारे ५ च्या दरम्यान झाली. ज्या गाडीने त्याला उडवले ती गाडी फरार असल्याचे समजते ही घटना गोंधवणी पेट्रोल पंपा जवळ झाली आहे. सरपंच भारत तुपे यांनी शहर पोलिसांना कळविले त्यानंतर श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल हापसे व पोलीस नाईक पवार हे तातडीने घटनास्थळी पोहोचले तसेच मृताच्या नातेवाइकांनी अज्ञात वाहन विरुद्ध श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून अज्ञात वाहन विरुद्ध गुन्हा रजिस्टर ११०२/२०२० नंबर कलम २७९, ३०४(अ), मोटार कायदा कलम १८४ प्रमाणे, १३४ अ ब याप्रमाणे गुन्हा रजिस्टर करून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल हापसे व पोलीस नाईक पवार हे पुढील तपास करीत आहेत.
Home महाराष्ट्र अहमदनगर कोपरगाव श्रीरामपूर जवळ निमगाव- खैरी रस्त्यावर दुचाकीला अपघात, युवकाचा जागीच मृत्यू
कोपरगाव
श्रीरामपूर जवळ निमगाव- खैरी रस्त्यावर दुचाकीला अपघात, युवकाचा जागीच मृत्यू
By SamajsheelJul 09, 2020, 16:58 pm0
353
Previous Postसातगाव पठार येथील २२ कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक संपन्न
Next Postअकोला जिल्ह्यातील आलेगांव येथे चोरांचा धुमाकूळ - दीड लाख रोख व दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास