BREAKING NEWS
Search

संपर्क तुटलेल्या चिखलेवाडी ग्रामस्थांची सुभाष पवार यांच्याकडून विचारपूस ; जीवनावश्यक वस्तूंचे कीटचे वाटप

401
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले असतानाच, चार दिवसांपासून संपर्क तुटलेल्या चिखलेवाडी येथे होडीने जाऊन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी  ग्रामस्थांची विचारपूस केली. तसेच तहसीलदार संदिप आवारी यांच्यासह ग्रामस्थांना दिलासा देऊन जीवनावश्यक वस्तूंचे कीट प्रदान केले. यावेळी त्यांनी आपण आपत्तीच्या काळात पाठीशी असल्याचे आश्वासन देऊन ग्रामस्थांना धीर दिला. मुरबाड तालुक्यातील चिखलेवाडी गावात पोहचण्यासाठी पूल होता. मात्र तो २००९ च्या मुसळधार पावसात वाहून गेला होता. त्यानंतर या ठिकाणी पूल उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी चिखलेवाडीचा संपर्क तुटतो. मात्र, एक-दोन दिवसांतच पाणी ओसरल्यानंतर गावाशी संपर्क होत असे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत असल्यामुळे चिखलेवाडी येथील 30 आदिवासी कुटुंबांना संपर्काविना राहावे लागत होते. त्यांना जीवनावश्यक वस्तूही मिळत नव्हत्या. या परिस्थितीची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी तहसीलदार संदिप आवारी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला सुचना दिली. त्यानंतर ते जीवनावश्यक वस्तूंच्या किट घेऊन होडीने प्रवास करून चिखलेवाडी येथे पोहचले व  ग्रामस्थांची विचारपूस केली. राज्य सरकार व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चिखलेवाडीला जोडणारा पूल बांधण्यासाठी पाठपुरावा करेन, असे आश्वासन उपाध्यक्ष पवार यांच्याकडून देण्यात आले. या वेळी मोहन भावार्थे, चिखलेचे सरपंच प्रकाश घोडविंदे, आसोळेचे सरपंच प्रविण कोर, मंडळ अधिकारी, तलाठी यांचीही उपस्थिती होती. या दौऱ्यामुळे ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. मात्र 2009 पासुन आजपर्यंत पुल वाहून गेल्यावर कुठ्ल्याही लोक्रतिनिधींनी कडून दखल न घेतल्याने 2009 पासुन या ग्रामस्थांना दरवर्षी या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत आता तरी पुल होणार का ? असा सवाल केला जात आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *