BREAKING NEWS
Search

सप्टेंबर पासुन सुरू होणाऱ्या मुरबाड रेल्वे च काय झालं? मुरबाडकरांचा सवाल

502
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : कल्याण-मुरबाड रेल्वेच्या प्रत्यक्ष कामाला सप्टेंबरअखेर सुरुवात होईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना दिले असल्याने प्रत्यक्षात सप्टेंबर 2022 पर्यंत रेल्वेच्या कामाला सुरूवात होणार असे जाहिर झाल्यानें सप्टेंबर महिना संपत आल्याने मुरबाड रेल्वेचे काय? असा सवाल जनता विचारत आहे. हे आश्वासन देताना या प्रकल्पाच्या निविदा मंजूर करण्याची कार्यवाही वेगाने करण्याचे आदेशही दिले असल्याचं जाहिर करत हा तुमच्या लोकसभेचा प्रोजेक्ट नसून, माझा महत्वाचा प्रोजेक्ट आहे,’ असे अश्विनी वैष्णव यांनी सांगीतले होते. तब्बल सात दशकांपासून कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची प्रतिक्षा केली जात आहे. तर प्रत्येक लोकसभा व विधान सभेच्या  निवडणुकीत आणि आता जिल्हा परीषद व ग्रामपंचायत निवडणुकीत हि रेल्वेचे आश्रसन दिलें जात आहे. मात्र, 2014 मध्ये खासदारपदी निवडून आल्यानंतर पत्रकार व खासदार कपिल पाटील यांनी सातत्याने मुरबाडपर्यंत रेल्वेमार्ग मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करताना दिसत आहे   या प्रकल्पाने शेतकऱ्यांबरोबरच रेल्वेलाही मोठा फायदा होणार असल्याकडे लक्ष वेधले होते. अखेर या प्रयत्नांना यश येऊन 2016  च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा केली होती. त्यानंतर रेल्वेकडून विविध पर्याय तपासून पाहण्यात आले. सुरुवातीला उल्हानगर, त्यानंतर टिटवाळामार्गे मुरबाडपर्यंत रेल्वे नेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, अखेर कल्याण-आंबिवली-मुरबाड असा रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला. या प्रकल्पाचे काम वेगाने होण्यासाठी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून सातत्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्यता देत 2019  मध्ये ऑनलाईन भूमिपूजन ही केलें होतें.
राज्यात सत्तापालट होताच, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 11 जुलै रोजी मुरबाड रेल्वे मार्गाच्या रखडलेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून 50 टक्के वाटा उचलण्याची हमी दिली गेली राज्य सरकारने युद्धपातळीवर हालचाली करून दुसऱ्या दिवशीच रेल्वे मंत्रालयाला महाराष्ट्र सरकारकडून 50 टक्के खर्चाची हमी घेतली जाणार असल्याचे पत्र पाठविले. त्यामुळे नव्या भाजपा-शिवसेनेच्या राजवटीत कल्याण-मुरबाड रेल्वेला गती येणार? असे बोलले जात असताना सप्टेंबर मध्ये प्रत्यक्षात सूरू होणाऱ्या कामाचे काय झालं?  असा सवाल विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीतील रेल भवन येथे खासदार कपिल पाटील यांनी भेट घेतली होती. तसेच रेल्वे मंत्रालयाला पुढील कार्यवाही करण्याची विनंती केली. त्यावेळी  वैष्णव यांनी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग हा तुमच्या लोकसभेचा प्रोजेक्ट नसून, माझा महत्वाचा प्रोजेक्ट आहे, असे उद्गार काढले होते . तसेच या रेल्वे मार्गाबाबत  कार्यवाही करून रेल्वे विभागाच्या सर्व विभागीय तरतुदी पूर्ण करून, येत्या सप्टेंबरअखेरपर्यंत रेल्वेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, असे आश्वासन दिले असताना या प्रत्यक्षात कामाची सुरूवात कधी होईल याची मुरबाडकर वाट पाहत असून आश्वासन पूर्ततेची. वाट पाहत आहे.
रेल्वे प्रकल्पांच्या मान्यतेसाठी तांत्रिक मुद्द्यांबरोबरच विविध मान्यतांमुळे जादा कालावधी लागण्याची शक्यता असते. मात्र, कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्प हा एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीचा असल्याने त्याला मान्यता देण्याचा अधिकार रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आहे. ते या प्रकल्पासाठी अनुकूल असल्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वे लवकर मार्गी लागणार असल्याची अपेक्षा आहे. सध्याच्या रेल्वेच्या नियमावलीनुसार, कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाचे कार्यकारी संचालक समितीद्वारे मूल्यमापन होईल. त्यानंतर वित्तीय समितीच्या सदस्यांद्वारे तत्वतः मान्यता दिली जाईल. मुरबाड रेल्वे प्रकल्पाची निश्चित केलेली 857 कोटींची किंमत व त्याची व्यवहार्यता तपासून तो मंजुरीसाठी नीति आयोग व अर्थ मंत्रालयाकडे पाठविला जाईल. त्याला नीति आयोगाचे मूल्यांकन मिळाल्यानंतर 21 दिवसांत रेल्वेच्या विस्तारीत बोर्डाच्या बैठकीत मान्यता दिली जाणार आहे. या प्रकल्पाला रेल्वे बोर्डात अंतिम मंजूरी दिली जाऊन, त्याच्या प्रती नीति आयोग, अर्थ मंत्रालय आणि सांख्यिकी विभागासह सर्व सदस्यांना वितरित केल्या जातील. विशेष म्हणजे एखाद्या प्रकल्पाची किंमत एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्याला रेल्वे मंत्री मंजूरी देऊ शकतात. त्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम सप्टेंबरअखेरपर्यंत प्रत्यक्षात सुरू होईल, अशी ग्वाही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली असताना व सर्व कालावधी पूर्ण झाल्याने मुरबाडकर रेल्वेच्या प्रत्यक्षात होणाऱ्या कामाच्या प्रतीक्षेत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे कधी काम सुरू होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *