BREAKING NEWS
Search

सरळगावं मधील वाहतूक कोंडी सुटली ; मुरबाड शहरातील कधी सुटणार? नागरिकांचे पायी चालणे झाले कठीण

427
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : तालुक्यांतील राष्ट्रीय महामार्ग 61 वरील सरळगावं बाजारपेठेत आठवडे बाजारामुळे सतत वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी होत असताना मोठ्या दुर्घटना होऊ नये यासाठी सरळगावं ग्रामपंचायत चे सरपंच, एस टी महामंडळाचे अधिकारी, ब वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी एकत्र उपाययोजना आखून सरळगावं येथे होणारी वाहतूक कोंडी सोडवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. असे असताना मात्र मुरबाड शहरातील वाहतूक कोंडी कधी सुटणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुरबाड शहरात विकासकामे करताना नगरपंचायत ने नागरिकांना चालण्यासाठी फूटपाथ बनवले हे फूटपाथ मोकळे करण्यासाठी अनेक वेळा मागण्या झाल्या. मागणी कर्त्यांना आश्र्वासन दिले, पोलिस प्रशासन व नगर पंचायत यांनी बैठका घेतल्या. मात्र आज पर्यंत वाहतूक कोंडी सोडविण्यात अपयश आल्याचे समोर आले. व्यापारी वर्गाला अवजड वाहने कधी आणावे याच्या सूचना दिल्या. मात्र याबाबत कठोर अंमलबजावणी न झाल्यानं पायी चालणे देखिल कठीण झाले आहे. शहरात फुटपाथवर गाळे धारकांचे अतिक्रमणं, त्यापुढे त्यांचे बॅनर चे स्टँड व लोखंडी पायऱ्या, भाडेकरू त्यात फेरीवाले यामुळें विदयार्थी, जेष्ठ नागरिक, महीला वर्गाला पायी चालणे कठीण झाले आहे. मात्र प्रशासन कुठलीच ठोस कारवाई करत नसल्याचे मुरबाड शहर वाहतूक कोंडीत सापडले असल्याने मुरबाड वाहतूक कोंडीतून कधी मुक्त होणार असा प्रश्र्न उपस्थित होते आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *