BREAKING NEWS
Search

स्व .सुशिला गंगाराम रेणके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राजेंद्र रेणके परिवाराकडून कवठे परिसरातील जिल्हा प्राथमिक शाळांना शालेय साहित्य वाटप करणार – १०० फुलझाडे लावण्याचा संकल्प – सनी रेणके 

204

शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील प्रसिद्ध ढोलकीपटू,महाराष्ट्रात एकेकाळी गाजलेले तमाशा फडमालक स्व.गंगारामबुवा कवठेकर (रेणके) यांच्या पत्नी सुशीला गंगाराम रेणके यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे पुत्र राजेंद्र,शिक्षिका सून,नातू अनिकेत यांच्या वतीने कवठे येमाई परिसरातील कवठे येमाई,गणेशनगर,मुंजाळवाडी,निमगाव दुडे,फाकटे या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ३१,००० रुपये किमतीचे शालेय साहित्य वाटप करणार असून त्यांचे चुलत नातू सामाजिक कार्यकर्ते विशाल (सनीभैय्या) रेणके यांजकडुन आपल्या आजींच्या आठवणी नेहमी स्मरणात राहाव्यात या उद्देशाने १०० विविध प्रकारची फुलझाडे,गावातील दत्तमंदिराजवळील वैकुंठस्मशान भुमीत व तसेच मुस्लिम कब्रस्थानात लावण्यात येणार आहेत. रेणके कुटुंबीयांनी आपल्या प्रियजनांच्या आठवणींचा सुंगध कायम दरवळत ठेवण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न नक्कीच विधायक असा आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *