BREAKING NEWS
Search

२८ व्या वाढदिवशी २८ झाडांचे तांदळी शाळेत वृक्षाक्षारोपण – ऍड.गणेश कळसकर यांचा विधायक उपक्रम 

621

 तांदळी,शिरूर : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पूर्व भागातील तांदळीच्या जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आपल्या २८ व्या वाढदिवशी २८ झाडांचे वृक्षाक्षारोपण करीत ऍड.गणेश कळसकर यांनी वाढदिवसाच्या अवास्तव खर्चास फाटा देत विधायक उपक्रम साजरा करीत इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

सध्याचा कोरोनाचा वाढता आलेख पाहता कोविड -१९ च्या नियमांचे पालन करीत कळसकर यांनी ठराविक ग्रामस्थांसमवेत शालेय परिसरात वृक्षारोपण करीत आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र केशव गदादे, शाळेचे शिक्षक कळमकर, बनकर, वृक्षप्रेमी निलेश कळसकर, सागर कळसकर, सुनील लांडगे उपस्थित होते. यावेळी स्कूल स्कूल कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र गदादे यांनी ऍड. कळसकर यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *