BREAKING NEWS
Search

14 महिन्यानंतर कंपनी अटी शर्ती ठेऊन कंपनी सूरु ; बेरोजगारीचे संकट टळले

392

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) :  मुरबाड एम आय डी सी मधील नामांकित कंपनी गेल्या 14 महिन्यापासून बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती, अनेक कामगार उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधात स्थलांतरीत झाले मात्र आज अक्षयतृतीया च्या मुहूर्तावर 14 महिन्या नंतर कंपनी सूरू केल्याने कामगारांचा वनवास संपला असल्याच्या प्रतिक्रिया कामागार वर्गातून येत आहे. मात्र अटी शर्ती ठेऊन कंपनी व्यवस्थपनाने कंपनी सूरू केल्याचे सूत्रांनी माहिती दिली. कामगार एकता युनियन  व कामगार एकता प्रतिनिधी यांनी 14 महिने लढा दिल्याने 14 महीने बंद असलेला कारखाना आज सूरु झाला, कामगार एकतेचे सेक्रेटरी भालचंद्र साळवी, संघटनेचे सचिव सुमित पाटील,आगरी सेना तालुका प्रमुख महेश भगत तसेच कामगार अध्यक्ष  रमेश जाधव, निवृत्ती केंबारी ,दत्तात्रय मडके,लक्ष्मण गडगे, बाळकृष्ण भोईर, मार्तंड भोईर, व कंपनीचे  व्यवस्थापक रामानुज बामने यांच्या हस्ते अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आज गेट खुले करून नव्याने सुरूवात करण्यात आली. कंपनी प्रशासन व कामगार यांच्यात अनेक बैठका झाल्या मात्र कुठलीही चर्चा सफल होत नव्हती यामुळें कामगारांचे भविष्य टांगणीला लागले होते. कंपनी प्रशासनाने 50 वर्षावरिल वयाच्या कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता या हि निर्णयाला कामगार तयार झाले. यामुळें जवळपास 160 ते 170 कामगार राजीनामा देऊन इतर कामगाराच्या भविष्यासाठी कामावरून कमी झाले. असे असतानाही अनेक अटी शर्ती ठेऊन कंपनी सूरू झाल्याने कामावर वर्ग खूश असून बेरोजगारीचे संकट टळले आहे. 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *