Search

जांबूतच्या विकासात स्व.किसनराव म्हस्केंचे योगदान मोठे – पोपटराव गावडे 

965

   टाकळी हाजी,शिरूर : (प्रतिनिधी,संजय बारहाते,सा.समाजशील) – शिरूर तालुक्यातील जांबुत गावच्या सर्वागिण विकासामधे माजी सरपंच किसनराव म्हस्के यांचे मोलाचे योगदान असुन, त्यांच्या  स्मृती जपण्यांचे काम सर्वानी करावे असे प्रतिपादन माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले .
माजी सरपंच स्व . किसनराव म्हस्के यांच्या कुटुबियांनी जय मल्हार विद्यालयास स्वखर्चाने प्रवेशद्वारांचे बांधकाम करून दिले त्यांचा लोकार्पण सोहळा माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते झाला.  या वेळेस घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, पंचायत समितीचे सदस्या अरूणा घोडे, माजी पंचायत समिती सदस्य वसुदेव जोरी,डॉ शिवाजी जगताप, तंटा मुक्तीचे माजी अध्यक्ष सिताराम म्हस्के, जय मल्हार विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस कापसे, डॉ प्रदीप  म्हस्के, डॉ खंडू फलके,माजी सरपंच बाळासाहेब फिरोदिया, बाबासाहेब फिरोदिया, चांदाभाऊ गावडे, आनंद शिंदे, माजी चेअरमन नाथा जोरी, भिकाजी शिंदे, संपत पानमंद,दामोधर दाभाडे,आनंद जगताप यांच्यासह मोठया प्रमानात ग्रामस्थ उपस्थित होते .
या वेळी  माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, जांबुत गावच्या विकासासाठी सरपंच पदाच्या माध्यमामधुन किसन म्हस्के यांनी मोठ्या प्रमाणात विविध योजना राबविल्या. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परीवारांने मोठया दानशुर भावणे मधुन प्रवेशद्वारांचे बांधकाम करून देत शाळा व गावच्या वैभवामधे भर टाकली आहे.शाळेसाठी खासदार अमोल कोल्हे यांनी दोन वर्गखोल्याचे काम मंजुर केले असुन शैक्षणिक विकासासाठी निधीची कमतरता पडु देणार नाही अशी ग्वाही पोपटराव गावडे यांनी दिली .
या वेळी प्रस्ताविकामधे मुख्याध्यापक आर एस कापसे यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीची माहीती देत लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ व म्हस्के कुटुंबियांनी दाखविलेल्या योगदाना मुळेच शाळेचे रूप पालटले असल्याचे सांगितले. यावेळी राजेंद्र गावडे,अरुणा घोडे यांची भाषणे झाली. स्वागत एस बी जाधव, रमेश अर्जुन, तर सुत्रसंचालन एस टी जाधव आभार बाळासाहेब फिरोदिया यांनी मानले .
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *