Search

गोडाऊन मधून चोरी करणाऱ्या टोळीचा रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश

601

   शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या चमाडिया गोडाऊन येथुन  एलजी कंपनी चे टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन भरलेल्या टेम्पोतून दि. 31 जानेवारी रोजी पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी एलजी कंपनीचे सात टीव्ही चोरी केले होते. तर 20 फेब्रुवारी रोजी चमाडिया गोडाऊन येथे एलजी कंपनीचे मालाने भरलेलया  टेम्पोतील ६ एलजी कंपनीचे टीव्ही अज्ञात चोरट्यांनी चोरी केले होते. रांजणगाव एमआयडीसीतील व्यावसायिक गोडाऊन मधून पंधरा दिवसात एलजी सारख्या नामांकित कंपनीचे टीव्ही चोरी गेल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी रांजणगाव पोलीस स्टेशनच्या डीपी पथकाचे कर्मचारी यांना योग्य सूचना करून सदरची दोन्ही प्रकरणे उघडकीस आणण्याचे सक्त आदेश दिले होते.

पोलीस नाईक अजित भुजबळ, पोलीस नाईक मंगेश थिगळे यांनी त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळवून दोन्ही घडलेले गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे गोडाउन मध्ये बाहेरून माल भरण्यासाठी येणाऱ्या गाडीवरील चालक हे, गोडाऊन मध्ये माल भरून पार्क केलेल्या गाड्यांमधील टीव्ही चोरी करत आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर रांजणगाव पोलिसांनी सापळा रचून संतोष प्रकाश पवार सध्या राहणार रांजणगाव गणपती, शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार चंदनपुरी नाशिक, नितीन ज्ञानदेव बुळे,रा.रांजणगाव गणपती, शिरूर जिल्हा पुणे, मूळ रा. कळस पिंपरी पाथर्डी जि. अहमदनगर यांना ताब्यात घेतले असून त्यांचेकडून दोन्ही गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेले अडीच लाख रुपयांचे एलजी कंपनीचे १३ टीव्ही आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली बोलेरो पिकअप असा एकूण साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दोन आरोपींनी रांजणगाव पोलीस स्टेशन व शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील व्यावसायिक गोडाऊन मधील सिगारेट माल चोरी केला असल्याचे निष्पन्न होत असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, बारामती विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत  रांजणगाव पोलीस स्टेशन यांचे सूचनेप्रमाणे पोलीस हवालदार तुषार पंदारे, पोलीस नाईक अजित भुजबळ पोलीस नाईक मंगेश थिगळे, पोलीस नाईक प्रफुल्ल भगत, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे या पथकाने केली ही कारवाई केली आहे. पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *