BREAKING NEWS
Search

हातावरचे पोट असणाऱ्या २५ कुटुंबांना धान्य,किराणा साहित्य देऊन मदतीचा हात – रामलिंग महिला उन्नती संस्थेचा उपक्रम 

630
      शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) –  देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकडाऊन सुरु असल्याने हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरीबांचे हाल होत आहेत. हीच गोष्ट लक्षात घेत शिरूर तालुक्यातील रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या वतीने आज रामलिंग येथील गरिबीत जीवन व्यथित करीत असलेल्या व आता त्यांच्या खाण्याचे हाल होत असल्याचे पाहून २५ कुटुंबांना पुढील १० दिवस पुरेल एवढे अतिआवश्यक किराणा साहित्य संस्थेच्या वतीने या गरीबांना घरपोच देण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी दिली.
    यावेळी पूनम औटी यांनी या वस्तीतील कुटुंबांना कोरोना या विषाणुला घाबरून न जाता स्वतः घरगुती काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी संचारबंदीचे उल्लंघन न करता,गर्दी न करता,जेवढा सोशल डिस्टन्सच ठेवता येईल तेवढा ठेऊन काळजीपूर्वक हे अन्न-धान्य व किराणा साहित्य त्यांना देण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत समाजातील अशा गरजू व गोरगरीब लोकांना इतरही लोकांनी मदतीचा हात देऊन त्यांना जगण्यासाठी मदत करावी.आम्ही मदतीचा हाथ पुढे केलाय तुम्ही ही करा असे कळकळीचे आवाहन राणी कर्डिले यांनी केले. यावेळी प्रमिला कापरे ,उमेश घावटे उपस्थीत होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *