Search

कवठे येमाई,पुणे : शिरूरच्या पश्चिम भागातील कान्हूर मेसाई व इतर १० गावाना तातडीने पाण्याची व्यवस्था करा – विठ्ठल पवार व शिष्टमंडळाची सरकारकडे मागणी

1366
        कवठे येमाई,पुणे : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कान्हूर मेसाई व इतर १० दुष्काळाने होरपळत असलेल्या गावांना तातडीने पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार,सुधीर पुंडे व शेतक यांच्या शिष्टमंडळाने सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.पावसा अभावी शेती तर पिकली नाहीच, पाणी तातडीने मिळाले तर पशुधन वाचेल. अन्यथा भिक मागुनही कोणी दान्याचा कणही देणार नाही, आता थापा मारणे बंद करा.नोटा खाऊन पोट भरणार नाही असा सणसणीत इशारा पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम,कृषी संचालक शितोळे, ऊपविभागिय आयुक्त जाधव यांना व सरकारला समक्ष व ईमेल निवेदना द्वारे दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
       शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना व शिरूर तालुक्यातील १० गावातील शेतक-यांच्या वतीने सुधीर पुंडे,शहाजी दळवी व शेतकऱयांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. यावेळी विरीधी पक्षाचे नेते माजी मंत्री अजित पवार यांनाही निवेदन देण्यात आले.
जनावरांनसाठी दावणीला चारा – पाणी द्या, तर ग्रामीण नागरीकांसाठी पिण्याचे पाणी, टँकर किंवा कँनॉलला पाणी सोडून पाणी तलाव, पानवटे भरुन द्या अशी मागणी वरील अधिकार्याकडे केली आहे. डिंबा उजवा कालवा, तर चासकमानच्या कालव्याला तातडीने आवर्तन सोडून उचल पद्धतीने हे पाणी शिरूर मधील कान्हूर मेसाई व इतर १० पाण्यावाचून होरपळणाऱ्या गावांना देण्याची मागणी जिल्हाधीकारी यांचेकडे केली.
        यावेळी शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार, सचिव नंदा जाधव, जिल्हाकार्याध्यक्ष भरत काळे, ऊपाध्यक्ष रोहीदास काळे, हवेली तालुकाध्यक्ष हनुमंत गव्हाणे, कान्हूर मेसाईचे सुधीर पुंडे, निवृती नानेकर, गजानन नळकांडे, दत्ता भंडारी, विठ्ठल धुमाळ, सुरेश नानेकर, गणेश धुमाळ व हवेली, शिरुर, आंबेगांव, खेडमंचर, दौंड, इंदापुर, बारामती, पुरंधर, पुणे, सोलापुर, सातारा, सांगली, कोल्हापुर येथील शेतकरी मोठ्या संख्खेने ऊपस्तीत होते.
       सरकारने सत्तेसाठी राजकारण जरुर करावे पण जनतेच्या जिवाशी खेळू नये अन्यथा पाण्यासाठी तडफडणारे पशुधन शहरात सोडुन देऊ हा इशाराच विठ्ठल पवार यांनी सरकारला दिला.
         यावेळी पवार पुढे म्हणाले कि, भाजप-सेना सरकारहो तुम्हांला बहुमताने सत्ता दिली तिचा व ग्रामीण शेतकरी कष्टकरी ग्रामीण जनतेचा सन्मान राखा. ना १५ लाख मिळाले, ना कर्जज माफी, ना विजबिल मुक्ती मिळाली. हमी भाव तर सोडा पण जो हमीभाव जाहीर केला तोही देत नाहीत.? काँग्रेसने ५० वर्षे छळ केला पण तुमी तर ४ वर्षोत पार जिरीवली हे सरकारचं वागणं बरं नाही.
सेना – भाजपला व मंत्र्यांना निवडणूकीचंच पडलय पण शेती, शेतकरी, पशुधन या विषयी सत्ताधार्यांना गांर्भियच रखहीलेलं नाही कसा आरोप विठ्ठल पवार यांनी यावेळी केला.हुमणी, किडरोगाने बाधीत कृषिक्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश द्या.करपुन गेलेले पिकाचे पंचनामे, दुष्काळी भागात पिण्याचे पाणी टँकर त्वरीत सुरु करण्याचे आदेश द्या. २० आक्टोबर पासुन कँनॉल ला पाणी सोडुन पाणी तलाव, पाणवटे,शेततळी भरुध द्या. ३० आक्टोबर पुर्वी संपुर्ण पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ सदृष्य परिस्तीती जाहीर करा, बाधीत सर्व क्षेत्रास एकरी २५ हजार नुकसान भरपाई तत्काळ जाहीर करा. अशी मागणी करत सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावे २०१८ चे निवडणुकीवर बहीष्कार टाकतील आणि आणखी ऐक अगळे वेगळे आंदोलनही सुरु करतील हे सरकारला परवडणारे नाही. असा इशाराही विठ्ठल पवार यांनी दिली आहे.
– प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक,(सा.समाजशील)Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *