BREAKING NEWS
Search

कोपरगावातील एक 35 वर्षीय महिला व 20 वर्षीय मुलाचे अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह

820

  कोपरगाव,अहमदनगर  : (स्वप्नील कोपरे,सा.समाजशील वृत्तसेवा) – अहमदनगर जिल्ह्यातील
कोपरगाव शहरातील एका खाजगी डॉक्टरसह त्यांचे ७२ वर्षीय वडील व मुंबई येथून ग्रामीण भागातील धारणगाव शिवारात आलेला पाहुणा असे तिघे कोरोना बाधित आढळले होते. प्रशासनाने गुरुवारी (दि.२) या तीनही बाधित रुग्णांच्या नजीकच्या संपर्कातील एकूण २० व्यक्तीना कोपरगाव येथील कोरोना केअर सेंटर येथे संस्थात्मक क्वारंटाईन केले होते. त्यापैकी डॉक्टरच्या संपर्कातील ११ व्यक्ती व मुंबई येथील पाहुण्याच्या संपर्कातील ९ व्यक्तींचा समावेश होता. या सर्व २० जणांनाच्या घशातील स्त्राव घेऊन अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 18 अहवाल  हे काल प्राप्त झाले होते त्यामध्ये 3 जणांचा अहवाल हा काल पॉझिटिव्ह तर 15 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला होता .

20 पैकी उर्वरित 2 अहवाल आज शनिवारी दुपारी प्राप्त झाले असून दोनही अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.आज प्राप्त झालेल्या अहवालां मध्ये बाधित असलेल्या दोघांपैकी एक 35 वर्षीय महिला आहे. ती कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील असून सदर महिला ही बाधित डॉक्टरच्या संपर्कात आली होती. तर  दुसरा कोरोना बाधित हा मुंबई येथील मात्र धारणगाव शिवारात आलेला बाधित असलेला पाहुणा  त्याचा 20 वर्षाचा मुलगा आहे. आज हे दोन अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोपरगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बाधित रुगणांच्या संपर्कातील अजून 21 जणांचे स्राव घेऊन आज ते नगर सिव्हिल येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. आता या 21 जणांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची व काळजी घेणे गरजेचे आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *