BREAKING NEWS
Search

मुरबाड पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीत भाजपचे श्रीकांत धुमाळ तर उपसभापती पदी अरुणा खाकर

922

मुरबाड,ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,समाजशील वृतसेवा) : नवीन आरक्षण जाहीर झाल्यानंतर मुरबाड पंचायतसमितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे तरुण उमेदवार श्रीकांत धुमाळ तर उपसभापती पदी अरुणा खाकर प्रत्येकी 10 विरूद्ध 5 मतांनी निवडून आले. मुरबाड पंचायतसमितीमध्ये भाजपचे 11 सदस्य असून म्हणजेच पूर्ण बहुमत असूनही भाजपचे सदस्य विष्णु घुडे यांनी बंडखोरी करून शिवसेना तर्फे सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता मात्र ते पराभूत झाले. तर उपसभापती पदासासाठी शिवसेनेचे प्रकाश सुरोशे यांनी अर्ज भरला होता या दोघांनाही प्रत्येकी 5 मते पडली मुरबाड पंचायत समिती मध्ये भाजपचे 11 तर शिवसेनेचे 5 असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेच्या प्रगती गायकर गैरहजर राहिल्याने एकूण 16 पैकी 15 उमेदवारांनी मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार अमोल कदम यांनी काम पाहिले. निवडणूक हि कोरोनाच्या पार्शवभूमीवर सोशल डिस्टन्स चे नियम पाळून व मास्क तसेच सॅनिटायझर चा वापर करण्यात आले. 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *