BREAKING NEWS
Search

मुरबाड संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर मधील असुविधांचा वणवा संपला ; नवनिर्वाचित पंचायत समिती सभापतींनी घेतली दखल

515

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड मधील पशेणी येथील एन.टी.टी.एफ. या संस्थात्मक क्वारनटाईन सेन्टर मध्ये असुविधा असल्याचे फोटो शोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. तर मुरबाड मनसेचे शहराध्यक्ष नरेश देसले याना सेंटर मधील एका व्यक्तीने संपर्क करून तेथील सत्य परिस्थिती व अनेक सुविधांचा अभाव असल्याचे सांगत मनसेने मदतीची अपेक्षा व्यक्त केली, तसेच अस्वछ परिसर व अपुऱ्या सुविधा तसेच घाणीचे साम्राज्य, निरजंतुकीकरण याबाबत काही छायाचित्र व माहिती दिली. सदर गोष्ट सोशलमीडिया वर टाकली व  त्यानंतर छायाचित्रांची दखल घेउन मुरबाड़ पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती श्रीकांतजी धुमाळ यांनी तत्परतेने सदर ठिकाणास भेट देऊन सर्व आढावा घेतला व प्रशासनाच्या वतीने कामे पुर्ण केली.यामुळे क्वारनटाईन सेन्टर मधील असुविधाचा वणवा संपला. मात्र सोशल मीडियावर आलेल्या माहितीमुळे समस्या सोडविल्या गेल्या, त्यामुळे मनसेने सभापतींचे जाहीर आभार व्यक्त केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *