Search

शेतकऱ्यांची मुख्यमंत्री तथा मुख्य सचिवाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५,००० रु मदतीची मागणी

639
पातूर,अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : पातूर तालुक्यामध्ये गत वर्षी सततच्या पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले. तसेच या वर्षी ढगफुटी व सततच्या पावसाने शेकडो हेक्टर शेतातील खरीप पीक खरडून गेले. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना अंकुर फुटल्याने पातूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. तसेच या वर्षीचा उन्हाळी कांदा खरेदी करतांना व्यापाऱ्यांनी कोरोना लॉकडाऊनचा हवाला देत दोनशे ते पाचशे रुपये क्विंटल प्रमाणे खरेदी केला. ह्यात शेतकरी उत्पादन खर्च वसूल करू शकला नाही. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या अनुषंगाने पातूर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा मुख्य सचिव यांचे कडे दि.२३ रोजी निवासी तहसीलदार विजय खेडकर यांच्याकडे निवेदन देऊन शेतकऱ्यांना सरसकट एकरी २५,००० रुपयांची शेतकऱ्यांनी केली मागणी.
गेल्या काही वर्षा पासून निसर्गाच्या प्रकोपाने अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक बाजू निसर्गाच्या अवकृपेने चांगलीच कोलमडली असतांना त्यात कोरोना आजाराने भर घातल्याने सदर आजाराचा प्रादुर्भाव टाळण्या हेतूने केंद्र सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन केला. नेमक्या याच वेळी शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरला. लॉकडाउनचा हवाला देत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कांदा दोनशे ते पाचशे रुपये क्विंटल प्रमाणे खरेदी केला. ह्या मध्ये शेतकरी उत्पादन खर्च वसूल करू शकला नाही. परंतु विद्यमान राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला.विविध बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित केले. या अनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठी मेहनत करून खरीप पिकाची पेरणी केली. सदर पीक काढणीच्या अवस्थेत असतांना दि.१३ रोजी ढगफुटी, चक्रीवादळाने धुमाकूळ घालून शेकडो हेक्टर शेत जमिनीतील खरीप पीक खरडून नेले. दि २१,२२ रोजी मुसळधार पावसाची दमदार हजेरी व सततच्या पावसाने सोयाबीनच्या उभ्या झाडांच्या शेंगांना अंकुर फुटल्याने सदर पिकाचे मोठे नुकसान झाले.या अनुषंगाने पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पातूर तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री तथा मुख्य सचिव मुंबई यांचे कडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी सरसकट २५,००० रुपयांची मागणी केली. सदर निवेदन विजय बोचरे, श्रीधर लाड, पंडित वानखडे, सुनील इंगळे, अजाबराव घायवट,  युनूस पटे, नामदेव मोहाडे, दिनेश पजई, जयराम लठाड, समाधान बोरकर, अविनाश घायवट, दिलीप कुरई, योगेश घायवट आदीं सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *