BREAKING NEWS
Search

बळीराजा शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी म्हसे बुद्रुक येथील सोनुभाऊ विठ्ठल मुसळे यांची निवड   

447

   टाकळी हाजी,शिरूर : (प्रतिनिधी,सतीश भाकरे) – बळीराजा शेतकरी संघटनेच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी  म्हसे बुद्रुक येथील सोनुभाऊ विठ्ठल मुसळे यांची निवड झाली आहे .
बळीराजा शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश गणगे यांनी मुसळे यांना निवडीचे पत्र दिले.या निवडीबद्दल मुसळे म्हणाले की, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात आवाज उठविला जाईल. त्यासाठी शिरूर तालुक्यामध्ये संघटनेची बांधणी गावागावात जाऊन करणार आहे. तरुण शेतकऱ्यांना संघटनेमध्ये स्थान देऊन त्यांच्यामध्ये शेतीविषयक ध्येय धोरणांची जागृती निर्माण करण्याचे काम करणार आहे. शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनीता गावडे यांच्या हस्ते मुसळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन सोपानराव भाकरे,मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय मुसळे ,प्रकाश भाकरे ,सोमनाथ भाकरे ,बाबाजी रासकर, उद्योजक अजय पवार, प्रकाश वायसे, मुकुंद मुसळे, शिवाजी चाटे, पाडुरंग खाडे,गुलाब पवार,चंद्रकांत गावडे उपस्थित होते .




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *