Search

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर परिसरात बंद असलेले मठ,मंदीर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करा –  विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचे वतीने घंटा नाद, शंख नाद व ढोल वाजवून आंदोलन

362
           घोडेगाव,आंबेगाव : (प्रतिनिधी,सीताराम काळे) –  श्री क्षेत्र भिमाशंकर येथे कोरोना महामारीच्या आपदा काळात मठ-मंदिराचे  बंद करण्यात आलेले दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचे वतीने घंटा नाद, शंख नाद व ढोल वाजवून आंदोलन भिमांशंकर येथे करण्यात आले.
             केंद्र शासनाच्या आदेशानुसार ८ जून पासून इतर राज्यांमध्ये सर्व धार्मिक स्थळे उघण्यात आली आहेत. पण महाराष्ट्र शासनाने अजूनही देवालये उघडण्याचा दृष्टीने आदेश दिलेला नाही. मठ-मंदिराचे बंद करण्यात आलेले दरवाजे उघडण्यात यावेत अशी मागणी वारंवार करूनही महाराष्ट्र राज्य सरकार परवानगी देत नाही. यासाठी श्री क्षेत्र भिमाशंकर येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी खेड तालुक्यातील सह संयोजक प्रतिक दौंडकर, भूषण चैधरी, निकेत आरबूज, तुषार दौंडकर, अमोल डंबरे, आंबेगाव तालुक्यातील सुमित शिनगारे, अक्षय जगदाळे, प्रशांत साबळे, तुषार बारवे, अमोल शेवाळे, अनिकेत डावखर, ऋषीकेश वाळुंज आदि उपस्थित होते.
          आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, राहुल लाड यांच्या मार्गदर्षनाखाली मंदिर व मंदिर परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *