वडगाव शेरी,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – एकीकडे कोरोनाचे भयावह संकट,त्यामुळे गोरगरीबांच्या रोजी रोटीवर आलेली कुऱ्हाड,कुटूंब जगावयाचे व जगायचे कसे ? हा यक्ष प्रश्न पुढे असताना अशा संत समयी गोरगरीबांच्या मदतीला अनेकांचे हात पुढे झाले. त्याचाच प्रत्यय पुण्याच्या वाडगावशेरी,खराडी परिसरातील असहाय्य गोरगरीबांना देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वडगावशेरी विधानसभासमन्वयक,शिव अंगणवाडी पुणे जिल्हा संघटिका अमृतताई पठारे यांनी दिला आहे.तर परिसरातील गोरगरिबांसमवेत व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन दिवाळी सण साजरा करण्याचा खूपच आनंद वाटल्याचे अमृतताई पठारे यांनी सांगितले. वडगावशेरी प्रभाग क्रमांक 4, खराडी, थिटेनगर व परिसरातील गोरगरीबांना ही दिवाळीचा आनंद घेता यावा या हेतूने सामाजिकतेचे जाणीव ठेवत कार्यरत असणाऱ्या अमृतताई पठारे यांनी अमृत बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून स्वतः प्रत्यक्ष अशा गोरगरीबांच्या घरी भेटी देत त्यांच्या व्यथा जाणून घेत आपुलकी व मायेचे दर्शन घडवीत दिवाळी निमित्ताने अनेक कुटुंबाना,लहानग्यांना,माता- भगिनींना नवीन कपडे, किराणा साहित्य,मिठाई देत त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोना मुळे देशा सह सर्वत्र संकट आल्यामुळे सगळीकडे संकटमय वातावरण आहे तरीही पठारे यांनी आपल्या प्रभागातील व परिसरातील गोरगरीब व असहाय लोकांची दिवाळी सर्वांना आनंदाची जावी या हेतूने अमृतताई पठारे यांनी केलेला हा छोटासा प्रयत्न,उपक्रम नक्कीच कौतुकास्पद,अभिनंदनीय व आदर्शवत असाच आहे.