BREAKING NEWS
Search

बँक एटीम मधून 45 लाख 98 हजार लंपास ; चोरट्यांना मुरबाड पोलिसांनी केले 18 तासात जेरबंद

419
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील एटीएम मधून 45 लाख 98 हजार 200 रुपये लंपास केल्या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 42 लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी मुरबाड येथील पत्रकार परिषदेत दिली.
24 मार्च रोजी ही रक्कम चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. सदर चोरट्यानी तंत्रज्ञान वापरून कुठेही एटीएम ला न फोडता 45 लाख 98 हजार रुपये लंपास केले. विशेष म्हणजे चारही आरोपी मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागतील आहेत. नरेश मोरे (रा.कळभाडं), सुरेश चौधरी, नितीन चौधरी व सुरेश चौधरी सर्व (रा.तुळई) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी नितीन मोरे हा इतर एटीएम मध्ये कॅश टाकणाऱ्या गाडीवर सहाय्यक म्हणून काम करत होता. त्याने नरेश मोरे यांना तांत्रिक माहिती दिली व इतर दोघांनी त्यांना सहाय्य केले. या आरोपींना 3 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील आरोपी कडून 39 लाख 69 हजार सातशे रुपये रोख रक्कम हस्तगत केले. तर आरोपी पैकी एकाने चोरलेल्या रकमेतील 2 लाख रुपये कर्जाच्या हप्त्यासाठी मुरबाड टीडीसी बँकेत भरल्याचे तपासात उघड झाले. तर दुसऱ्याने मोटर सायकल व बोलेरो कार दुरुस्ती साठी 1 लाख  10 हजार रुपये खर्च केल्याचे समोर आले. या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उप विभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनखाली  पोलीस निरीक्षक  दत्तात्रय बोराटे हे अधिक तपास करत आहे. तसेच कल्याण मुरबाड रस्त्यावर लुटमार करणाऱ्यासह संशयितांना मुरबाड, कल्याण ग्रामीण व बदलापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नगर जिल्ह्यातील पारनेर येथून अटक करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मात्र ए.टी.एम. मधील 45 लाख 98 हजार लंपास करणाऱ्या चोरट्यांना 18 तासात जेरबंद करणाऱ्या मुरबाड पोलीसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या तपासात अनिल सोनानी, पो.उप निरीक्षक निकम, तोडकर, निंबाळकर, तडवी, डोईफोडे, चतुरे, अडबोल, निचिते, मोरे ,रामा  शिंदे, विनायक खेडकर, माळी जया फाले यांनी तपास कामात मोलाची कामगिरी केली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *