BREAKING NEWS
Search

पुण्यात आजपासून मिनी लॉकडाऊन ; बाजारपेठेत गर्दी झाली कमी

318

पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) : शहरात वाढत असलेल्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर प्रशासनाकडून आजपासून मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. संध्याकाळी 6 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच दिवसाला जमावबंदीदेखील लागू करण्यात आली आहे. आजपासून लावण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे दरोरोज बाजारपेठेत होणारी गर्दी कमी झाली असून, बाजारात सकाळच्या वेळेस तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे. मिनी लॉकडाऊनमुळे नुकसान पण प्रशासनाला सहकार्य करणार. वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर लावण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे आमचे प्रचंड नुकसान होणार आहे. नुकसान जरी होत असेल तरी आम्ही प्रशासनाला सहकार्य करणार आहोत आणि प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीचा काटेकोरपणे पालन करणार असल्याची भूमिका महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *