BREAKING NEWS
Search

अलिबाग,रायगड : नेरळ मध्ये प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या केल्या प्रकरणी एका तरुणींसह दोन तरुणांना अटक, महिनाभरापूर्वी हरविलेल्या तरुणाचे रहस्य उलगडले

834
             अलिबाग,रायगड : प्रेयसीला त्रास देतो याचा राग मनात ठेवून त्याची निर्घृण हत्या करणाऱ्या प्रेयसी आणि तिच्या प्रियकरासहित एक साथीदार असे एकूण तिघांना नेरळ पोलिसांनी अटक केली असून या आरोपीना पोलीस कोठडी मिळाली आहे .
    मिळालेल्या माहिती नुसार  नंदू कालेकर हा 13 ऑक्टोबर पासून गायब होता. नेरळ पोलीस त्याचा तपास करीत असतांनाच ज्या संशयितांची सखोल चौकशी केली त्यांनीच नंदूला महिना भरापूर्वीच त्याच दिवशी ठार मारल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाल्याने शुक्रवारी पहाटे नेरळ पोलिसांनी आरोपीना घटनास्थळी नेवून पाहणी केली असता दामत येथील रेल्वे ट्रक जवळील क्रिकेट मैदानाजवळ गवतात कुजलेल्या अवस्थेत नंदू चा मृतदेह निदर्शनास आला.
               या घटनेबाबत मिळालेले सविस्तर वृत्त असे कि, अनिल राऊत वय 27 रा. बोर्ले ता. कर्जत आणि कुमारी निशा विरले 22 तलवंडे ता .कर्जत यांचे प्रेम संबंध होते, असे असतांनाही नंदू कालेकर 26 रा. वंजारपाडा हा निशाला कायम त्रास देत असे. निशा हिने हि गोष्ट आपला प्रियकर अनिल यास सांगितली . त्यामुळे अनिल संतप्त झाला आणि त्याने नंदू कालेकर याचा काटा काढण्याचे ठरविले. यासाठी त्याने आपला साथीदार मंगेश भवारे रा. मोहाची वाडी,  नेरळ आणि प्रेयसी निशा यांच्याशी मिळून संगनमत करुन  नंदू कालेकर याला या तिघांनी गोड  बोलून दामत येथील रेल्वे पटरीच्या बाजूला असलेल्या क्रिक्रेट मैदानाजवळ बोलावले,  नंदू येताच आरोपींनी पूर्व नियोजित कटाप्रमाणे त्याला शीतपेयातून विषारी औषध पाजले. विष बाधेने तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडताच त्याचा गळा निशाच्या ओढणीने आवळला आणि नंदू मृत झाल्याची खात्री पटल्यावर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह तेथील गवतात लपवून ठेवला होता .
              विशेष म्हणजे नंदू कालेकर हा 13 ऑक्टोबर पासून अचानक गायब झाला होता. त्याच्या नातेवाईकांनी तो हरविल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात नोंदवली होती. नेरळ पोलिसांच्या त्या दृष्टीने तपास सुरु असतांनाच त्याची हत्या झाल्याची बाब तब्बल एक महिन्यानंतर शुक्रवारी पहाटे समोर आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता तो अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. या हत्येचे वृत्त वाऱ्यासारखेच पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. पोलिसांनी पंचनामा केला असून डीवायएसपी जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शखाली नेरळ ठाण्याचे एपीआय सोमनाथ जाधव, उप निरीक्षक शिवाजी ढवळे हे अधिक तपास करीत आहेत.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा,समाजशील,अलिबाग)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *