BREAKING NEWS
Search

शरदवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी वासुदेव सरोदे तर व्हाईस चेअरमनपदी अंकुश सरोदे यांची बिनविरोध निवड 

501
शरदवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी वासुदेव सरोदे तर व्हाईस चेअरमनपदी अंकुश सरोदे यांची बिनविरोध निवड 
            शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या बेट भागातील शरदवाडीच्या जय हनुमान विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी वासुदेव हरीभाऊ सरोदे याची तर व्हा चेअरमन पदी अंकुश सखाराम सरोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडनुक निर्णय अधिकारी पुंड  यांनी काम पाहिले.
              शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी ही निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल शरदवाडी ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे. यावेळी माजी आमदार गावडे यांच्या हस्ते अध्यक्ष,उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.   यावेळी शरदवाडी येथील मा चेअरमन, व्हा चेअरमन व संचालक ,सभसद, ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.  तसेच जांबूतचे माजी उपसरपंच गणेश सरोदे, माजी चेअरमन जनार्दन सरोदे, ग्रां पं सदस्य,सुभाष सरोदे,कोंडीभाऊ पोकळे, अशोक गांजे,अध्यक्ष भजनी  मंडळ, माजी चेअरमन अंकुश गांजे, भाऊ मेचे ,किसन गांजे व उपस्थित  सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *