BREAKING NEWS
Search

अमृतताई पठारे – सामाजिक, विधायक क्षेत्रात धडाडीने कार्य करणारी नारीशक्ती 

567
             शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) -सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती संस्था आपण पहात असतो. किंबहुना विविध माध्यमातून त्यांच्या कार्याबद्दलची माहिती आपण वाचत असतो. त्याचेच एक उत्तम व आदर्शवत असे उदाहरण म्हणजे पुण्याच्या वडगाव शेरी परिसरात अमृत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित सर्वसामान्य नागरिक,महिलांना अडचणीच्या वेळी दिलासा देण्याचे काम करणाऱ्या नारीशक्ती अमृतताई कैलासराव पठारे या होत. मागील दोन वर्षांपासून सर्वत्रच घोंगावत असलेले कोरोनाचे भयावह संकट व त्यामुळे गोरगरीबांच्या रोजी रोटीवर आलेली कुऱ्हाड,कुटूंब जगावयाचे व जगायचे कसे ? हा यक्ष प्रश्न पुढे असताना अशा कठीण समयी गोरगरीबांच्या मदतीला अनेकांचे हात पुढे झाले. त्याचाच प्रत्यय पुण्याच्या वाडगावशेरी,खराडी परिसरातील असहाय्य गोरगरीबांना देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या  वडगावशेरी विधानसभा समन्वयक,शिव अंगणवाडी पुणे जिल्हा संघटिका अमृतताई पठारे यांनी दिला आहे.तर परिसरातील गोरगरिबांसमवेत व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होताना खूपच आनंद  वाटत असल्याचे अमृतताई पठारे यांनी सा.समाजशीलशी बोलताना सांगितले.
            वडगावशेरी प्रभाग क्रमांक ४, खराडी, थिटेनगर व परिसरातील गोरगरीबांना वेळोवेळी सामाजिकतेची जाणीव ठेवत कार्यरत असणाऱ्या अमृतताई पठारे यांनी अमृत बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून स्वतः प्रत्यक्ष अशा गोरगरीबांच्या घरी भेटी देत त्यांच्या व्यथा जाणून घेत आपुलकी व मायेचे दर्शन घडवीत अनेकदा अशा गोरगरीब कुटुंबाना,लहानग्यांना,माता- भगिनींना नवीन कपडे, किराणा साहित्य,मिठाई देत त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला आहे.याच बरोबर महिलांच्या अडचणी सोडवणे,त्यांना काम मिळवून देण्यात मदत करणे,अन्यायाविरुद्ध आवाज उठवने,महिलांना सेल्फडिफेन्स शिकवणे,पोलीस बांधवांना मदत करणे,रक्तदान शिबिर,आरोग्य शिबीर,अनेक आश्रमांत मदतीचा हात,अपंग मुलांना खाऊ वाटप,शालेय साहित्य वाटप,महापुरुषांच्या जयंती साजरी करून जुन्या इतिहासाला उजाळा देणे,गरीब,हुशार,गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ घेत त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे,याच बरोबर मागील वर्षी कोल्हापूर परिसरातील पूरग्रस्त व या वर्षी चिपळूण परिसरातील पूरग्रस्तांना जमा झालेली मदत स्वखर्चाने थेट पुरग्रस्तांपर्यंत पोहचविण्याचे काम केवळ सामाजिकतेची जाण ठेवत त्यांनी केले आहे.
           त्यांच्या या अद्वितीय कामाची पावती,शाबासकीची थाप त्यांना वेळोवेळी मिळत असली तरी पुढील काळात ही प्रामाणिकपणे गोरगरीब,समाज व महिलांसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा त्यांचा मानस कायम आहे. वडगाव शेरी व परिसरात अमृतताई पठारे यांनी केलेल्या सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक,विधायक कार्याची दखल श्रीशंभू साम्राज्य सेना महाराष्ट्र राज्य यांनी घेत त्यांचा शिक्षकदिनी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. आपल्या प्रभागातील,परिसरातील व इतर ठिकाणच्याही गोरगरीब,महिला,मुले व असहाय कुटुंबांना अमृतताई पठारे यांनी वेळोवेळी मदतीचा हात देण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न,उपक्रम नक्कीच कौतुकास्पद,अभिनंदनीय व इतरांसाठी आदर्शवत असाच आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *