BREAKING NEWS
Search

 शिवशंभू जिजाऊ सामाजिक सेनेच्या पुणे जिल्हा संघटन व संपर्क प्रमुख पदी सुभाष शेटे यांची निवड 

416
 शिवशंभू जिजाऊ सामाजिक सेनेच्या पुणे जिल्हा संघटन व संपर्क प्रमुख पदी सुभाष शेटे यांची निवड 
             शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाईचे असलेले सुभाष शेटे यांची शिवशंभू जिजाऊ सामाजिक सेनेच्या पुणे जिल्हा संघटन व संपर्क प्रमुख पदी निवड झाली आहे.शिरूर तालुका विद्यार्थी व युवक संघटक म्हणून कारेगावचे निलेश वाळुंज तर पारनेर तालुकाध्यक्ष पदी बाजीराव काळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबाबतचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष योगेश ओव्हाळ यांनी त्यांना दिले आहे.
             मागील १५ वर्षांपासून विविध माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांची निर्भीडपणे मांडणी करीत सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या अडचणी समजून घेत त्या प्रकर्षाने सोडविण्यासाठी प्रकर्षाने प्रयत्नशील असलेले सुभाष शेटे यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत अध्यक्ष योगेश ओव्हाळ यांनी  त्यांची शिवशंभू जिजाऊ सामाजिक सेना पुणे जिल्हा संघटन व संपर्कप्रमुख पदी निवड केली आहे.पुढील काळात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याकामी सामाजिकतेची जाणीव कायम ठेवत कार्यरत राहणार असल्याचे शेटे यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष योगेश ओव्हाळ,संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख विशाल फलके  व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
संस्थापक अध्यक्ष योगेश ओव्हाळ



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *