BREAKING NEWS
Search

कवठे येमाई गाव परिवर्तनातून पूर्ण दारूमुक्त करणार – पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांची ग्वाही – नियम न पाळणारे व सहकार्य न करणाऱ्यांना बसणार कायदाचा कडक दणका 

269
             शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई गावात सूरु असलेले अवैध दारू धंदे तात्काळ बंद व्हावेत या उद्देशाने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी आज बुधवार दि. १३ ला सायंकाळी ६ ला येथील ग्रामपंचायत सभागृहात ग्रामस्थांसमवेत समन्वय बैठक घेत अवैध दारू विक्रेत्यांना समज देत त्यांच्यात परिवर्तन व्हावे व यापुढील काळात त्यांनी प्रामाणिकपणे व्यवसाय करून जीवन, चरितार्थ चालवावा या उद्देशाने त्यांच्यात परिवर्तन करून गावात अवैध दारू विक्री पूर्ण बंद करणारच असा संकल्प वजा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.
लोकसंख्येने मोठ्या असलेल्या कवठे येमाई गावात सध्या २७ अवैध दारू,ताडी विक्री करणारे असल्याचे सांगत राऊत यांनी या सर्वांनी आगामी ८ दिवसांत स्वयंस्फूर्तीने हे धंदे बंद करावेत. अन्यथा पोलीस त्यानंतर आपल्या पद्दतीने कायदेशीर कारवाई करतील असा कडक इशारा ही दिला. गावात लवकरच पोलीस,ग्रामस्थ यांच्या समन्वयातून दारूबंदी कमेटी स्थापन करण्यात येणार असून त्या द्वारे प्रथम या अवैध दारू विक्रेत्यांचे मतपरिवर्तन करून दारू धंदे मुक्त गाव करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. तर अशा प्रकारे परिवर्तन व्हावे म्हणून शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावातुन या उपक्रमाची प्रथमच सुरुवात करत असून येथील ग्रामस्थ या परिवर्तन उपक्रमास नाक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतील व गाव १०० टक्के दारूबंदीमुक्त होईल असा विश्वास ही पोलीस निरीक्षक राऊत यांनी व्यक्त केला आहे.
 तर गावच्या वतीने पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे  कौतुक करीत पोलिसांच्या या परिवर्तन उपक्रमास ग्रामस्थांचे पूर्ण सहकार्य राहील असा विश्वास पोलीस निरीक्षक राऊत यांना दिला. सामाजिक कार्यकर्ते रामदास सांडभोर यांनी पोलीस प्रशासनाने दारूविक्री बंदी,दारूमुक्त गाव करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने शिरूर तालुक्यात प्रथमच कवठे येमाई गावात सुरू केलेल्या या उपक्रमाचे स्वागत व अभिनंदन केले.ग्रामस्थ या कामी पोलीस प्रशासनास नक्कीच सहकार्य करतील असे ही सांडभोर यांनी सांगितले. यावेळी गावाचे आजी-माजी पदाधिकारी,सहायक फौजदार नाजीम पठाण,भारमाळ व पोलीस सहकारी व
ग्रामस्थ उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *