BREAKING NEWS
Search

कवठे येमाईत श्री दत्त जयंती उत्सव सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ 

551
         शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाण येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री दत्तगुरुंचा मागील ४८ वर्षांपासून अखंडितपणे सुरु असलेला सप्ताह सोहळा (मागील वर्ष वगळता) व जयंती उत्सवास आज रविवार दि. १२ ला सकाळी गावातून भागवत पताका उंचावत,विठू नामाचा गजर करीत ग्रंथराज,कलश,विना,यांचा भाविक,वारकऱ्यांनी टाळ मृदूंगाच्या साथीत भजनाने भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा संपन्न झाला व खंड हरीनाम सप्ताहास सुरुवात झाली.
         यावेळी आखिल भारतीय वारकरी विश्व सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रसिद्ध प्रवचन व कीर्तनकार ह.भ.प. हिरामण महाराज कर्डिले, ह.भ.प.आनंदा महाराज पवार व ह.भ.प. बबन महाराज पवार,विणेकरी दशरथ गावडे,ग्रंथ,कलश मधुकर शिंदे,प्रताप पाटील इचके,बबन पोळ,गणेश रत्नपारखी,बबुशा कांदळकर पाटील,फक्कडराव सांडभोर,प्रमोद घाटकर,बाळासाहेब इचके व अनेक भक्तगण या दिंडी सोहळ्यात श्रद्धेने सहभागी झाले होते.
         कोरोना महामारी व शासनाच्या कोरोना प्रतिबंधक सूचना व नियमावलीस अनुसरून अखंड हरीनाम सप्ताह संपन्न करण्याचे व सप्ताह कालावधीत भाविक भक्तांच्या उपस्थितीत वीणाप्रहार,नियमित हरिपाठ,काकडा भजन करण्यात होणार असून रविवार दि. १९ पर्यंत चालणाऱ्या सप्ताहकाळात रात्री साडे आठ ते साडे दहा कालावधीत कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.दि. १९ काल्याचे कीर्तन,महाप्रसाद व त्यानंतर गावातून  दिंडी प्रदक्षिणाने सप्तांहाची सांगता होणार असल्याची माहिती श्री दत्त जयंती सप्ताह व उत्सव समिती कवठे येमाई यांनी दिली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *