Search

गुरुकुल वसतीगृहाचे उमाप यांच्या हस्ते उदघाटन

244
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरूर तालुक्यातील कोंढापूरी येथे आशीर्वाद ट्रस्ट संचलित गुरुकुल वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन पुणे येथील विक्रीकर उपआयुक्त संभाजी उमाप यांच्या हस्ते नुकतेच झाले .यावेळी कोंढ़ापुरीचे सरपंच संदीप डोमाळे, आयटीसी कंपनीचे अधिकारी सचिन डांगे, पोलीस उपनिरिक्षक अर्जुन शिंदे, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे ,आशा चौगुले, युवराज शेडगे, सावित्री शिंदे, ग्रामस्थ काळूराम धायरकर, सचिन नवले, आयटीसी लिमिटेड फूडस कर्मचारी, प्रकाश शिंदे, सचिन सावंत, माजी सरपंच नाना भुजबळ, भरत माळवे, दिव्या फाऊंडेशनचे संतोष सातकर आदी उपस्थित होते. वसतिगृहातील मुलांसाठी उद्घाटन प्रसंगी शासकीय अधिकारी व ग्रामस्थांनी आर्थिक मदत देखील केली. दरम्यान येथील वस्तीगृहात ५ खोल्या असून सुमारे २५ लाख रुपये खर्च झाले आहेत. गरीब होतकरू व निराधार मुले व मुली शिक्षणापासून वंचित राहू नये व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना येथील वस्तीगृहात मोफत प्रवेश देऊन जेवण व निवासाची मोफत सुविधा करण्यात येत आहे वसतिगृहातील मुलांना अध्यात्माची गोडी लागावी म्हणून दररोज हरिपाठ, ज्ञानेश्वरी व अभंग इत्यादीचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. सध्या येथील आश्रमात २५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दानशूर व्यक्तीने आर्थिक मदत करण्याचे आवाहन यावेळी केले.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *