BREAKING NEWS
Search

निरगुडसरला नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत – प्रदीपदादा वळसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती 

503
           मंचर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात आज दि. १३ नवीन शैक्षणिक वर्षांची सुरुवात झाली. विद्यालयात नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदिपदादा वळसे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयात १९९६ /९७ काळात शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यानी येथील वाचनालयास २५ हजार रूपयांची स्पर्धा पुस्तके भेट दिली
            यावेळी निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचीत उपध्याक्ष माजी सरपंच रामदास वळसे पाटील, मा.प्राचार्य बी.डी.चव्हाण, सरपंच उर्मिला ताई वळसे पाटील,उपसरपंच आनंदराव वळसे पाटील, उद्योगपती रामदास मिंडे,संतोष टेमकर,बाबाजी थोरात,नौशाद तांबोळी,विनायक कोर्हाळे, प्राचार्य गोरे मॅडम, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थितीत होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत झालेल्या स्वागताने मुलांचा आनंद द्विगुणित झालेला पाहावयास मिळत होता.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *