BREAKING NEWS
Search

अपघातातील जखमींना तत्काळ मदत करून प्राण वाचवणाऱ्या तरुणाचा मुरबाड पोलिसांकडून सत्कार

359

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : अपघात झाल्यावर मदत केल्यास पोलिसी खाक्याचा त्रास आपल्यालाच होतो या भीती पोटी अपघातग्रस्तांना पोलिस घटनास्थळी पोहचेपर्यंत कोणीच मदतीसाठी सरसावत नाही. यामुळे वेळीच मदत न मिळाल्यास बऱ्याचदा अपघात ग्रस्तांना आपला प्राण गमवावे लागतात. मात्र मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी अश्याच एका अपघातग्रस्तांची देवदूत म्हणुन मदत करून प्राण वाचविणऱ्या योगेश भोईर या तरुणाचा सत्कार करून आपघात ग्रस्तांना मदतीसाठी धाऊन येणाऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे.

राष्ट्रीय महामार्ग कल्याण मुरबाड-नगर 61 वर बिरवाडी फाट्यावर अपघात ग्रस्तांना विनाविलंब मिळेल त्या वाहनाने उपचारासाठी दाखल करून या तरुणाने अपघात ग्रस्तांना जीवदान दिले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस ही घटना ठिकाणी पोहचले. मात्र त्यापूर्वीच योगेश याने सर्व अपघात ग्रस्तांना उपचारासाठी दाखल केले असल्याने माणुसकीचे नाते जपणाऱ्या योगेश भोईर याचा मुरबाड पोलिस ठाण्यात सत्कार करण्यात आला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *