BREAKING NEWS
Search

अज्ञात आजाराच्या पार्श्वभूमीवर – पशुसंवर्धन विभागाकडून गांजेवाडीत २०० शेळ्या,मेंढ्यांचे लसीकरण – शेतकऱ्यांमध्ये समाधान 

387
         
           
        शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – अज्ञात आजाराने सुमारे ३० शेळ्या,मेंढ्यांचा मृत्यू या आशयाच्या सा. समाजशील मध्ये दि.०९ ला प्रसिद्ध झालेल्या सविस्तर वृत्ताची तालुका पशुसवंर्धन विभागाकडून तात्काळ दखल घेण्यात आली. दि. १० ला रविवार सुट्टीचा वार असून ही व सोमवारी कवठे येमाईचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. दत्तात्रय मुने,डॉ.मिलिंद देंडगे उपकेंद्र वरुडे, भय्या सांबरे मलठण यांच्या टीमने शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या गांजेवाडी परिसरातील सुमारे २०० शेळ्या मेंढ्याना अंत्र विषार( E .T .V) रोग निर्मूलन लस टोचली व ज्या काही शेळ्या आजारी आहेत  त्यांनाही उपचार वरिष्ठांच्या मार्ग दर्शना खाली सुरु करण्यात आल्याची माहिती डॉ. मुने यांनी दिली.
          सा.समाजशील व पशुसंवर्धन विभागाने दाखविलेल्या तत्पर सेवेबद्दल गांजेवाडी येथील अंकुश हनुमंत शिंदे,विकास बबन घोडे,बिपीन शिंदे,भरत गायकवाड,सुरेश घोडे,राजेंद्र मुलमुले व परिसरातील शेळ्या,मेंढ्या पालकांनी समाधान व्यक्त केले असून सा.समाजशील व स्थानिक पशुवैद्यकीय कर्मचाऱयांचे आभार मानले आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *