BREAKING NEWS
Search

वीज बिल भरुन महावितरणाला सहकार्य करा – महादू गोडे – कवठे येमाईत घरगुती वीज ग्राहकांकडे १५ लाख रुपयांची थकबाकी – वायरमन सुरेश पवार यांची माहिती  

576
           शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिम भागातील लोकसंख्येच्या व घरगुती वीज ग्राहकांची संख्या मोठी असलेल्या कवठे येमाई गावात घरगुती ग्राहकांकडे सुमारे १५ लाख रुपये थकबाकी असून महावितरांकडून वारंवार वीज बिले भरण्या संदर्भात आवाहन करण्यात येत आहे. सध्या गावात वीज बिल वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली असून थकीत वीज ग्राहकांनी आपल्याकडील देय वीज थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन फोरमन महादू गोडे यांनी सा.समाजशीलशी बोलताना केले आहे.

थकबाकी वसुली मोहीम जोरदारपणे सुरु करण्यात आली असून घरगुती वीज ग्राहकांकडे चालू वीज बिलांची सुमारे सहा लाख रुपये थकबाकी असून एकट्या कवठे येमाईत घरगुती वीज ग्राहकांकडे एकूण पंधरा लाख रुपयांच्या वर थकबाकी असल्याचे स्थानिक वायरमन सुरेश पवार यांनी सांगितले. सध्या स्थितीत एकूण ११० वीज ग्राहक थकबाकीदार असून यात ३० ग्राहक मोठ्या रकमेचे व ७० ग्राहक किमान रकमेचे थकबाकीदार असल्याचे पवार म्हणाले.

            कवठे येमाईत सध्या घरगुती वीज ग्राहक थकबाकीदारांचे थेट कनेक्शन तोडण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असून ती टाळण्यासाठी आपल्याकडील थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन शिरूरचे उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने यांनी केले आहे. वीज वसुली कामी महावितरणचे शिरूरचे फोरमन महादू गोडे,स्थानिक वायरमन सुरेश पवार,बाह्यश्रोत कर्मचारी नवनाथ गावडे,अभिजित कावळे यांची टीम कवठे येमाईत थकबाकीदार ग्राहकांशी थेट संपर्क साधय थकबाकी भरण्याचे आवाहन करीत आहेत. जे ग्राहक विज बिल वसुली मोहिमेस प्रतिसाद देणार  नाहीत अशा वीज ग्राहकांची वीज तोडण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात येण्याचा इशारा ही माने यांनी दिला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *