BREAKING NEWS
Search

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कवठे येमाई ग्रामपंचायतीचे १९३५ पासून स्वतंत्र अभिलेख वर्गिकरण

467
        शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – भारतीय स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील कवठे येमाई ग्रामपंचायतीने १९३५ पासून आज तागायतचे स्वतंत्र अभिलेख वर्गिकरण एक वेगळा उपक्रम हाती घेत पूर्ण केला आहे. शिरूर तालुक्यात कवठे येमाई ही गटविकास अधिकारी अजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्ड अद्ययावत वर्गीकरण करणारी ग्रामपंचायत ठरणार असून उद्या स्वतंत्रदिनी तालुक्याचे गटविकास अधिकारी अजित देसाई यांच्या हस्ते या ग्रामपंचायत रेकॉर्ड दालनाचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे सरपंच मंगलताई रामदास सांडभोर,उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
         शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील कवठे येमाई ही १७ सदस्य असलेली मोठी व जुनी ग्रामपंचायत आहे. नव्यानेच ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी पदी नियुक्ती झालेले चेतन वाव्हळ यांनी ग्रामपंचायत रेकॉर्ड वर्गीकरणाचे काम हाती घेतले. १९३५ सालापासूनचे सर्व दप्तर वर्गीकरण करण्यात आले. मागील महिनाभर हे काम सुरु होते. यात ग्रामपंचायत कर्मचारी वसंतराव सावंत,बबनराव शिंदे,विकास उघडे,अमोल पंचरास यांनी चिकाटीने हे रेकॉर्ड वर्गीकरणाचे काम पूर्ण केले असून कार्यालयातील एका खोलीत हे वर्गीकरण केलेले पूर्ण रेकॉर्ड व्यवस्थित पणे लावण्यात आले आहे. कवठे येमाई ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे तालुका गटविकास अधिकारी अजित देसाई,विस्तार अधिकारी बी आर गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.
          ” कवठे येमाई,मुंजाळवाडी,इचकेवाडी परिसरातील नागरिकांना ग्रामपंचायत कडे उपलब्ध असलेले १९३५ सालांपासूनचे अतिवाश्यक रेकॉर्ड वर्गीकरण करण्यात आले असून नागरिकांना ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असणारी जुनी व नवीन कागदपत्रे जलदगतीने मिळण्याकामी मोठाच उपयोग होणार आहे.”
                         – चेतन वाव्हळ – ग्रामविकास अधिकारी,कवठे येमाई 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *