Search

२५१ ऐतिहासिक किल्ल्यांची सफर – पुण्याच्या १२ वर्षीय जय राहुल दिवटे चा बालपणीच आगळावेळा छंद 

1146
          पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेला ऐतिहासिक वारसा,वास्तु,शिल्पकला,किल्ले,गड,मंदिरे जपण्याचे काम शासन,इतिहासप्रेमी,निसर्गप्रेमींकडून अव्याहतपणे सुरुच आहे. त्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण आपल्या कुटुंब,मित्रांसह अशा ऐतिहासिक स्थळांना भेटी देत तेथील महती,निसर्ग सौंदर्य अनुभवत असतात. पुण्याच्या मांजरी बुद्रुक येथील १२ वर्षीय व पायोनियर पब्लिक स्कुल मध्ये जेमतेम सहावीत शिकणारा असाच एक चिमुकला आपल्या निसर्गप्रेमी वडिलांच्या सोबत मागील काही दिवसांपासून सुट्टीच्या दिवशी राज्य व राज्याबाहेरील ऐतिहासिक किल्ल्यांची सफर करतोय व बालपणीच आगळावेगळा छंद जोपासण्याचे काम करतोय.
         राज्यासह परराज्यातील विविध ऐतिहासिक किल्ले,ठिकाणांना मागील अनेक वर्षांपासून भेटी देत त्यांची माहिती संकलित करून ती इतरांपर्यंत विविध माध्यमातून पोहचविण्याचा प्रयत्न करणारे मांजरी बुद्रुक,तालुका हवेली,जिल्हा पुणे येथील इतिहासप्रेमी राहुल दिवटे यांचा जय हा मुलगा. मार्च २०११ मध्ये जन्मलेल्या जयला लहानपणापासूनच वडिलांसोबत गड,किल्ले,ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देण्याचा जणू छंदच लागला.पाहता पाहता जय ने १२ वर्षे वय असतानाच राज्यातील २२९ किल्ले,कर्नाटकातील ७ व गोव्यातील १५ गड,किल्ल्यांची सफर केली आहे.
        यापैकी आव्हानात्मक असणारे गडकोट चंदेरी,पदरगड,गोरखगड ,जीवधन,शिंदोळा,ढाकोबा तसेच १०० पेक्षा जास्त लेणी,गुहा सह
महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील विविध गडकोट,किल्ल्यांना जय ने आपल्या वडिलांसमवेत भेटी दिल्या आहेत. जयचा सर्वात आवडता  किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील बानकोट व गोव्यातील कॅबो द रामा हा आहे. महाराष्ट्रामध्ये ६ भैरवगड आहेत. त्यातील सर्वात अवघड ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातील मोरोशीचा भैरवगड आहे तो सुद्धा सर करण्याचा पराक्रम चिमुरडया जय दिवटे याने केला आहे. त्याच उमेदीने येथून पुढे ही गड,किल्ल्यांना भेटी देण्याचे काम अविरतपणे सुरूच ठेवणार असल्याचे जयने सा. समाजशील शी बोलताना सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *