BREAKING NEWS
Search

हिवाळी श्रमसंस्कार शिबिर विद्यार्थ्यांना मार्गदर्शपर  – प्रदीपदादा वळसे पाटील – पहाडदरा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

293
 पारगाव,आंबेगाव : (प्रतिनिधी,अमिन मुलाणी) – विद्यार्थी दशेत असताना महाविद्यालयीन हिवाळी श्रमसंस्कार शिबिरातुन खुप काही चांगले शिकण्यासारखे व हिवाळी श्रमसंस्कार शिबिर विद्यार्थ्यांना मार्गदर्शपर असल्याचे प्रतिपादन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील यांनी केले. ते आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा येथे भीमाशंकर शिक्षण संस्थेचे, दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय दत्तात्रयनगर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.२४/१२/२०२२ ते शुक्रवार ३०/१२/२०२२ या कालावधीमध्ये विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शिबिर कालावधीमध्ये विविध विषयांवर चर्चासत्र व ज्ञान प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. शिबिरात एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
          ग्राम सर्वेक्षण, ग्रामस्वच्छता, वनराई बंधारे, जलसंवर्धन, वृक्षारोपण, नवमतदार नोंदणी, साक्षरता मोहीम असे विविध उपक्रम शिबिरा दरम्यान राबवले गेले.शिबिराच्या समारोप समारंभाच्या निमित्ताने मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भीमाशंकर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे यांनी भूषवले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिबिरातील ७ दिवसांत आलेले अनुभव मांडले. मान्यवरांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व आणि जीवन जगत असताना  त्याचा काय उपयोग होतो याची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले.
            यावेळी भीमाशंकर शिक्षण संस्थेचे सचिव वसंत जाधव, सदस्य शांताराम हिंगे, विद्यालयाचे प्राचार्य  शत्रुघ्न थोरात सर, अध्यक्ष ख. वि. संघ भगवान वाघ, संचालक भीमाशंकर स. सा. पुष्पलता जाधव, मा पं. स. सदस्य बाळासाहेब वाघ, धामणी सरपंच रेश्मा  बोऱ्हाडे, पहाडदरा उपसरपंच सुमन वाघ, शिरदाळे उपसरपंच मयूर सरडे,  मा. सरपंच भीमराव वाघ, मा. उपसरपंच सविता वायकर, अध्यक्ष पाणलोट समिती कांताराम वायकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश वाघ, उद्योजक गुलाब वाघ, मुख्याध्यापक जि. प. प्राथमिक शाळा मंगेश जावळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब शिंदे, सूत्रसंचालन बोंबले मॅडम आणि आभार प्रदर्शन राहुल डोळस, संजीवनी टाके यांनी केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *