BREAKING NEWS
Search

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सलीमभाई बागवान यांची महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल शिरूर येथे सन्मान

165

निर्वी, ता.शिरूर (प्रतिनिधी, शकील मणियार) : शिरूर येथे भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या वतीने सलीम भाई बागवान यांची महाराष्ट्र राज्य हज कमिटी वर संचालक पदी निवड झाल्याबद्दल शिरूर शहर भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.या आढावा बैठकीत महाराष्ट्र प्रदेश भाजप अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष सलीम भाई बागवान महाराष्ट्र अल्पसंख्याक  मोर्चा महिला उपप्रमुख रेश्माताई शेख, महाराष्ट्र प्रदेश भाजपा अल्पसंख्याक मोर्चा युवा उपप्रमुख प्रितेशभैया गादिया, भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजू भाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी अनेक विषयावर चर्चा करण्यात आले. सलीम बागवान यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे मोलाचे असे मार्गदर्शन केले. तसेच राजू भाई शेख यांनी अल्पसंख्याक योजना प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान केले. तसेच हुशेन शहा यांनीही आपल्या मनोगतामध्ये मार्गदर्शन करताना हज यात्रेसाठी शिरूर या ठिकाणावरून जास्तीत जास्त लोक पाठविण्याचे काम आपण करावे असे सांगितले. यावेळी भाजपा शिरूर शहर सरचिटणीस विजय नरके, अजित महाजन, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा शिरूर शहर अध्यक्ष हुशेन शाह, सरचिटणीस महावीर कोठारी, युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवम पाठकजी, राहील शेख, शिरूर शहर महिला अध्यक्षा रश्मीताई क्षीरसागर, सरचिटणीस आनघाताई पाठकजी, पूजाताई चोंधे, अल्पसंख्याक महिला मोर्चा अध्यक्षा प्रियंका कोठारी यांसह अधिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *