BREAKING NEWS
Search

राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चैत्रा श्रीराम इचके चे घवघवीत यश – बाल गटात देशपातळीवर दुसरा क्रमांक मिळवत दोन रजत पदकांची कमाई 

335
         शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पंजाब मधील मोहली येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये शिरूर तालुक्यातील चैत्रा श्रीराम इचके या सहा वर्षीय बालिकेने दोन रजत पदक पटकावत  या क्रीडा प्रकारात देशपातळीवर नेत्र दीपक कामगिरी केली आहे. चैत्रा ही मूळ शिरूर तालुक्यातील कवठे यमाई गावची असून सेवानिवृत्त पाटबंधारे विभागातील उपकार्यकारी अभियंता कोंडीराम तानाजी इचके यांची नात आहे.  सहा वर्षाच्या या बाल वयात तिने केलेली कामगिरी ही नक्कीच कौतुकास्पद व गौरवास्पद आहे.
      राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पाच ते सात या वयोगटात चैत्राची महाराष्ट्र राज्यातून देशपातळीवर निवड झाल्याने २५० मीटर व ५०० मीटर प्रकारात घवघवीत यश संपादन करीत दोन रजत पदकांची कमाई केली आहे. चैत्रा  ही पुण्यात जेमतेम सीनियर केजी वर्गात शिक्षण घेत असून आई-वडील व आजी आजोबा यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे हे यश संपादन करता आल्याचे तिने आवर्जून सांगितले. तर रोलर स्केटिंग या क्रीडा प्रकारासाठी योगेश कुमावत व संतोष राठोड यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन तिला मिळाले आहे. चैत्रा श्रीराम इचके या बालिकेने राष्ट्रीय स्तरावर रोलर स्केटिंग प्रकारात मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, शिरूर चे माजी आमदार पोपटराव गावडे, जि.प.सदस्य सुनीता गावडे,शिरूर पंचायत समितीच्या माजी सदस्य डॉ.कल्पना पोकळे,दिपालीताई शेळके,टाकळी हाजींच्या कार्यक्षम सरपंच अरुणा घोडे,शिरूर पंचायत  समितीचे सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे, सुदाम भाऊ इचके, गावच्या सरपंच सुनीताताई बबनराव पोकळे, उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, माजी सरपंच दीपक भाऊ रत्नपारखी, मिठूलाल बाफना, ग्रामपंचायत सदस्य वैशाली रत्नपारखी, मधुकर रोकडे, राजेंद्र इचके व ग्रामस्थांनी चैत्रा इचके हिचे अभिनंदन केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *