Search

ज्ञानगंगा विश्व विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जंयती साजरी

78

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : २ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि मा. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शिरूर तालुक्यातील बाबुरावनगर येथील ज्ञानगंगा विश्वविद्यालय येथे विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी वर्गातील व शाळेच्या परिसराची स्वच्छता करत स्वछता उपक्रम राबविला. तसेच स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरी काढत स्वच्छ भारत हा संदेश लोकांपर्यंत पोहचवला. गांधीजींचे विचार आपल्या कृतीत दिसले पाहिजेत ही सुरुवात स्वतः पासून करत एक तास स्वछता या उपक्रम अंतर्गत सर्व शिक्षकांनी आज शाळेची स्वच्छता केली. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांची वेशभूषा साकारली. तसेच  कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त लागावी, श्रम, कष्ट समजावेत यासाठी प्रत्येक घरात जाऊन झाडून स्वछता करणे ते लहान मुलांचा अभ्यास घेणे अशी विविध कामे करून स्काऊट गाईडसाठी १३,२०० रुपये एवढा निधी जमा केला त्याबद्दल विद्यार्थी आणि गाईड प्रमुख शेळके सर, प्रमिला जाधव, मुख्याध्यापक येवले सर व विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला.  यावेळी गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.राजेराम घावटे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. सुनिल भोईटे, संस्थेचे सी.इओ. डॉ.नितीन घावटे, मुख्याध्यापक संतोष येवले, उपमुख्यध्यापिका सुनंदा लंघे, कॉलेज समन्वयक व्ही.डी.शिंदे तसेच शिक्षक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *