BREAKING NEWS
Search

ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना शेती उपयोगी डिजिटल एप्लीकेशनसबंधी मार्गदर्शन

175

नेवासा, अहमदनगर (समाजशील वृत्तसेवा) : कृषी विज्ञान केंद्र, दहेगावने ता. नेवासा येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्नित असलेल्या सुलोचना बेल्हेकर समाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत कृषि महाविद्यालय, भानसहिवरे येथील ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कर्यानुभव कार्यक्रम 2023-24 (RAWE & AIA) अंतर्गत कृषीदूतांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ निर्मित फुले बळीराजा या एप्लीकेशन बद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाअंतर्गत कृषिदुत – गवळी विकास, गरड प्रदीप, गिरमकर ओम, खिलारी सचिन,पेहेरे सचिन यांनी सुकळी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘फुले बळीराजा’ (Phule Baliraja App)  डिजिटल कृषिसल्ला ॲप्लिकेशन (Crop Advisory App) या ॲप ची शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. तसेच फुले बळीराजा डिजिटल कृषी सल्ला ॲप शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल व हे ॲप शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यामधील दरी कमी करून शेतकऱ्यांना निश्चितच मार्गदर्शन करणार असून, जमीन व हवामान यात सुसंगतता साधून पिकाचे नियोजन करण्यासाठी या ॲप्लिकेशनचा उपयोग होणार असल्याचे  कृषीदतांमार्फत सांगण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्र, दहेगावने येथील अधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोज माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *